US ELECTION - राजकीय अनुभव नसलेले ट्रम्प ६० वर्षातील पहिले राष्ट्राध्यक्ष

By Admin | Published: November 9, 2016 04:06 PM2016-11-09T16:06:41+5:302016-11-09T16:07:32+5:30

बेताल, वादग्रस्त वक्तव्ये करुनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक नव्या गोष्टीही जोडल्या जाणार आहेत.

US ELECTION - Trump, not a political experience, was the first President of 60 years | US ELECTION - राजकीय अनुभव नसलेले ट्रम्प ६० वर्षातील पहिले राष्ट्राध्यक्ष

US ELECTION - राजकीय अनुभव नसलेले ट्रम्प ६० वर्षातील पहिले राष्ट्राध्यक्ष

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. ९ - बेताल, वादग्रस्त वक्तव्ये करुनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक नव्या गोष्टीही जोडल्या जाणार आहेत. ट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांपैकी ते सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील. पुढच्यावर्षी २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. 
 
अमेरिकेच्या ६० वर्षाच्या इतिहासातील प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसलेले ते पहिले अनुनभवी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणा-या ट्रम्प यांना गर्व्हनर, सिनेटर अशा कुठल्याही पदाचा अनुभव नाही. 
 
प्रचारा दरम्यान विरोधकांनी ट्रम्प यांची हिटलर, मुसोलिन या हुकूमशहाची तुलना केली होती. स्त्रीलंपट ते मूर्ख असे अनेक शब्द ट्रम्प यांना वापरण्यात आले. तरीही ट्रम्प त्यांना जे बोलायचे होतं ते बोलत राहीले आणि अमेरिकन मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. 
 

Web Title: US ELECTION - Trump, not a political experience, was the first President of 60 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.