US ELECTION: ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने मेक्सिकोच्या चलनात ऐतिहासिक घसरण

By admin | Published: November 9, 2016 10:07 AM2016-11-09T10:07:44+5:302016-11-09T11:51:49+5:30

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने आंतरराष्ट्रीय शेअरबाजार कोसळला असून मेक्सिको चलन पेसोमध्ये घसरण झाली आहे

US Elections: Historical fall in Mexico currency due to Trump taking lead | US ELECTION: ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने मेक्सिकोच्या चलनात ऐतिहासिक घसरण

US ELECTION: ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने मेक्सिकोच्या चलनात ऐतिहासिक घसरण

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर जगाचं लक्ष असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय शेअरबाजार कोसळला असून मेक्सिकोचं चलन पेसोमध्ये घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत पेसो ऐतिहासिक घसरणीवर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासून हिलरी क्लिंटन यांना कडवी झुंज दिली असून आघाडी घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या 197 मतसंघ मतांसोबत आघाडीवर असून हिलरी क्लिंटन 131 मतसंघ मतं मिळाली आहे.  विजयासाठी 270 मतसंघ मतांची गरज आहे. लोकप्रिय मतांमध्येही डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत.  क्लिंटन यांना 46 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 49 टक्के लोकप्रिय मते मिळाली आहेत.
 

Web Title: US Elections: Historical fall in Mexico currency due to Trump taking lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.