अमेरिकन दुतावास पुढील आठवड्यात जेरुसलेममध्ये, दिशादर्शक फलकही लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 02:39 PM2018-05-07T14:39:07+5:302018-05-07T14:43:01+5:30

इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला मान्यता देण्याचा आणि तेलअविवमधील दुतावास तेथे हलविण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला.

Us embassy road sign appears in Jerusalem | अमेरिकन दुतावास पुढील आठवड्यात जेरुसलेममध्ये, दिशादर्शक फलकही लागले

अमेरिकन दुतावास पुढील आठवड्यात जेरुसलेममध्ये, दिशादर्शक फलकही लागले

googlenewsNext

जेरुसलेम- पुढील आठवड्यामध्ये इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये अमेरिकेचा दुतावास स्थापन करण्यात येणार आहे. या दुतावासाचे दिशादर्शक फलक आज सोमवारी लावण्यात आले असून हा पुन्हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने गेल्या डिसेंबरमध्ये जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून दर्जा द्यावा असा प्रस्तान संयुक्त राष्ट्रामध्ये ठेवला होता.

14 मे रोजी अमेरिकन दुतावास तेल अविवमधून जेरुसलेम येथे स्थलांतरित होणार असून त्यासाठीचे इंग्रजी, हिब्रू आणि अरबी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत. डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेम येथे दुतावास आणून या शहराला इस्रायलची राजधानी म्हणून घोषित करण्याच्या निर्णयावर जगभरातून टीका झाली होती. पॅलेस्टाइनच्या समर्थकांनी त्याविरोधात निदर्शनेही केली होती. 2016 साली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना ट्रम्प यांनी प्रचाराच्या दरम्यान आपण जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देऊ असे सांगितले होते. या कृत्यामुळे इस्रायल-पॅलेस्टाइन प्रश्नातील मध्यस्थाची भूमिका अमेरिकेने गमावली आहे अशी टीका पॅलेस्टाइनच्या राजकीय नेत्यांनी केली. या निर्णयानंतर सौदी अरेबियाचे राजे सलमान व मध्यपूर्वेत अमेरिकेच्या अतिशय जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांनी मात्र या मुद्दयावर अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला होता. या निर्णयामुळे जगातील मुस्लिमांच्या भावना भडकतील, असं राजे सलमान यांनी म्हटलं होतं; तर यामुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेत अडथळा येईल असं अल-सिसी यांनी सांगितलं होतं.

Web Title: Us embassy road sign appears in Jerusalem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.