अमेरिका, युरोपने पाठिंबा द्यावा - बलुचिस्तानातील नेत्यांची मागणी
By Admin | Published: August 16, 2016 05:51 PM2016-08-16T17:51:20+5:302016-08-16T18:06:01+5:30
पाकिस्तान सरकारकडून होणा-या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिका आणि युरोपमधील देशांनीही पाठिंबा द्यावा अशी मागणी बलुचिस्तानातील नेत्यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १६ - पाकिस्तान सरकारकडून होणा-या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिका आणि युरोपमधील देशांनीही पाठिंबा द्यावा अशी मागणी बलुचिस्तानातील नेत्यांनी केली आहे.
पाकिस्तान धार्मिक दहशतवादाचा वापर करत असल्याचे जगाने समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या धोरणाचा परिणाम सर्वत्र होईल. दहशतवाद हा आपोआप कमी होणारा नसून त्याला जोरदार विरोध केला पाहिजे, असे बलुचिस्तानातील राष्ट्रीय चळवळीचे नेते खलील बलोच यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवी गुन्हांबाबत पाकिस्तानलाच जबाबदार धरले आहे. त्याला अमेरिका आणि युरोपातील देशांनीही पाठिंबा द्यावा अशी आशा बलुचिस्ताने केली आहे. गेली पाच वर्षे बलुचिस्तान स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात लढत आहे, असेही खलील बलोच यांनी सांगितले. तसेच, बलुचिस्तानातील सकारात्मक विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान उचित असल्याचेही यावेळी खलील बलोच म्हणाले.