अमेरिका वर्षाअखेरपर्यंत लस बनविण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 00:30 IST2020-08-02T00:30:22+5:302020-08-02T00:30:53+5:30
डॉ. फौसी : रशियाच्या लसींच्या दर्जाबाबत शंका

अमेरिका वर्षाअखेरपर्यंत लस बनविण्याची शक्यता
नवी दिल्ली : अमेरिकेला कोरोनावरील प्रतिबंधक लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभीपर्यंत बनविण्यात यश येईल अशी शक्यता असल्याचे अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅलर्जी अॅण्ड इन्फे क्शियस डिसिजेस (एनआयएआयडी) संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. रशिया, चीनने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या गुणवत्तेबद्दल फौसी यांनी शंका व्यक्त केली.
इंग्लंड, भारत, चीनसह काही देश बनवत असलेल्या लसींच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. रशियाच्या लसीला दोन आठवड्यांच्या आत मान्यता देण्याचा त्या देशाचा विचार आहे. सप्टेंबरमध्ये ही लस उपलब्ध होईल. मात्र या लसीच्या गुणवत्तेबाबत डॉ. अॅन्थनी फौसी यांना
खात्री नाही. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अमेरिकी सरकारने नेमलेल्या कृती गटाचे फौसी हे सदस्य आहेत. ते म्हणाले, लसीच्या योग्य प्रकारे चाचण्या होणे आवश्यक आहे. रशिया व चीन लस तयार केल्याचे दावे करत आहेत. त्यात फार तथ्य दिसत नाही.
संशोधनात अमेरिका आघाडीवर!
मानवी चाचण्यांच्या दुसºया टप्प्यानंतर चीनमधील एका कोरोना प्रतिबंधक लसीचा मर्यादित वापर करण्याची परवानगी तेथील सरकारने दिली आहे. तेथे सात लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र अमेरिका लस संशोधनात आघाडीवर असल्याचा दावा डॉ. फौसी यांनी केला.