अमेरिकेत 'या' पाच कंपन्यांच्या सीईओंनी घेतली माेदींची भेटले, दाेन कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:46 PM2021-09-24T13:46:06+5:302021-09-24T13:46:39+5:30
माेदींनी ॲडाेबेचे शंतनू नारायण, जनरल ॲटाेमिक्सचे विवेक लाल, क्वालकाॅमचे ख्रिस्तियानाे ॲमाॅन, फर्स्ट साेलारचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टाेनचे स्टीफन श्वार्र्झमॅन यांची भेट घेतली. या कंपन्यांनी भारतात माेठी गुंतवणूक केली आहे.
वाॅशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अमेरिका दाैऱ्यादरम्यान पाच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यापैकी दाेन कंपन्यांचे सीईओ हे भारतीय वंशाचे आहेत. डिजिटल इंडियाच्या आराेग्य, शिक्षण तसेच संशाेधन आणि विकासामध्ये या कंपन्यांच्या काैशल्याचा कसा लाभ हाेईल, याबाबत चर्चा केली.
माेदींनी ॲडाेबेचे शंतनू नारायण, जनरल ॲटाेमिक्सचे विवेक लाल, क्वालकाॅमचे ख्रिस्तियानाे ॲमाॅन, फर्स्ट साेलारचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टाेनचे स्टीफन श्वार्र्झमॅन यांची भेट घेतली. या कंपन्यांनी भारतात माेठी गुंतवणूक केली आहे. या कंपन्या आयटी क्षेत्रात आघाडीवर आहेत. सर्वप्रथम माेदींनी क्वालकाॅम या मायक्राेप्राेसेसर चिप उत्पादक कंपनीचे सीईओ ख्रिस्तियानाे ॲमाॅन यांची भेट घेतली. भारतात ५जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरू आहेत.
याशिवाय भारतात इलेक्ट्राॅनिक्स व दूरसंचार क्षेत्रात उत्पादनाच्या पीएलआय याेजनांबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात भारत निर्यातीचे केंद्र बनावे, यासाठी सहकार्य करण्यावर ॲमाॅन यांनी भर दिला.