अमेरिकेनं हाणून पाडला खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:49 PM2023-11-22T19:49:34+5:302023-11-22T19:51:19+5:30
"अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका शिख फुटिरतावाद्याला मारण्याचा कट हाणून पाडला आहे." मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्तासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमेरिकेत शीख फुटीरतावाद्यांच्या हत्येचा कट आपण हाणून पाडला आहे. यासंदर्भात भारतालाही इशारा देण्यात आला आहे, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. अहवालानुसार, शीख फॉर जस्टिस (एसएफजे) नेता गुरपतवंत सिंग पन्नू हा या कटाचे लक्ष्य होता.
फायनान्शिअल टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, "अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका शिख फुटिरतावाद्याला मारण्याचा कट हाणून पाडला आहे." मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्तासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या प्रकरणाशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीच्या विरोधामुळे कट रचणाऱ्यांनी आपली योजना बदलली, की एफबीआयने हस्तक्षेप केल्याने हा कट अयस्वी ठरला, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी भाष्य केलेले नाही. मात्र, भारताला राजनयिक इशाऱ्याव्यतिरिक्त, यूएस फेडरल अभियोजकांनी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात किमान एका संशयिताविरुद्ध सीलबंद आरोपपत्र दाखल केल्याचे वृत्तात म्हणण्यात आले आहे.'
जूनमध्ये झाली होती हरदीप सिंग निज्जरची हत्या -
तत्पूर्वी, याच वर्षी जून महिन्यात कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला होता. मात्र, भारताने हा आरोप फेटाळून लावला होता. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले.