दाऊदसाठी अमेरिकेची मदत घेणार
By admin | Published: October 2, 2014 01:00 AM2014-10-02T01:00:07+5:302014-10-02T01:00:07+5:30
1993 च्या मुंबई स्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी अमेरिकेची मदत घेतली जाईल.
Next
वॉशिंग्टन : 1993 च्या मुंबई स्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी अमेरिकेची मदत घेतली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या शिखर परिषदेत हा निर्णय झालेला आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंमद, दाऊद व त्याचे साथीदार (डी कंपनी) अल काईदा व हक्कानी संघटना या संघटनांना आश्रय देणा:या देशातील अड्डय़ांचा नाश करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय ओबामा व मोदी यांनी घेतला आहे.
यासंदर्भात एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी खात्याने मंगळवारीच पाकिस्तानातील दोन दहशतवादी संघटनांवर र्निबध जाहीर केले आहेत. मोदी व ओबामा यांच्या शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जैश ए मोहंमद, लष्कर ए तोयबा, डी कंपनी यांचे जाळे व आर्थिक स्त्रोत नष्ट केले जाणार आहेत. डी कंपनी हे दाऊद इब्राहिमच्या कंपनीचे नाव आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईच्या पश्चिम भागात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यात 25क् लोक मरण पावले असून, 7क्क् जखमी झाले आहेत. दाऊद इब्राहिम हाच या स्फोटांचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप असून, तो पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. तो कराची व दुबई अशा फे:याही करतो. त्याच्या संघटनेचे नाव निवेदनात असल्याने निवेदनाला महत्त्व आले आहे. (वृत्तसंस्था)
दाऊदचे प्रत्यार्पण देशात करवून घेण्यासाठी भारत अमेरिकेची मदत घेईल, असे संकेत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाच्या अधिका:यांनी दाऊदवर अधिक बोलण्यास नकार दिला. समझदार के लिए इशारा काफी है, असे परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी यासंदर्भात बोलताना सांगितले आहे.
4ऑक्टोबर 2क्क्3 मध्ये अमेरिकेने दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे जाहीर केले आहे. दाऊदचे संबंध अल काईदाशी असून, लष्कर ए तोयबा व इतर दहशतवादी संघटनांना तो आर्थिक मदत करतो, असा आरोप आहे.
4दहशतवादाचा सामना, गुप्तचर माहितीबाबत सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय मोदी व ओबामा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. मुंबईतील 2क्क्8 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना पाकिस्तानने लवकर शिक्षा करावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.