..तर २०० कंपन्या  चीन सोडून भारतात येतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 02:54 PM2020-04-20T14:54:54+5:302020-04-20T14:56:59+5:30

.त्या कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत!

US-India Strategic Partnership Forum says 200 manufactring companies might shift to Indianfrom China. | ..तर २०० कंपन्या  चीन सोडून भारतात येतील !

..तर २०० कंपन्या  चीन सोडून भारतात येतील !

googlenewsNext
ठळक मुद्देआताच भारताच्या बाजूनं लॉबिंग सुरु झालेलंही असू शकतं

कोरोनात्तोर काळात चिनमधून अनेक  कंपन्या विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपल्या गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे.
जपान सरकारने तर अलिकडेच घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि सांगितलं चिनमधून बाहेर पडा, जपानमध्ये परत या नाही तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पहा.
आता अमेरिकन कंपन्याही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ आणि कच्च मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील अशी शक्यता आहे.
तीच एक शक्यता यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक आणि पार्टनरशिप फोरम चे अध्यक्ष मुकेश अगी यांनी व्यक्त केली आहे. साधारण 200 कंपन्या भारतात आपले तळ उभारण्याच्या तयारीत आहे असं ते सांगतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची निवडणूक पार पडल्यावर ते होऊ शकेल असा त्यांचा अंदाज आहे.
्रअर्थात ही संधी आहे आणि त्यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यायला हवा असंही ते सांगतात. ते म्हणतात, भारतात अधिक पारदर्शक कारभार, नवी दिल्लीने आर्थिक सुधारणांना वेग दिला, बदल स्वीकारला तर या कंपन्या भारतात येतील आणि त्याचा भारताला फायदा होऊ शकेल.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत लॉबिंग ही नवी गोष्ट नाही, ती तिथं कायदेशीरही आहे. त्यामुळे आताच भारताच्या बाजूनं लॉबिंग सुरु झालेलंही असू शकतं, आता ही संधी खरंच भारत साधेल का, त्या कंपन्या भारतता येतील का, हे पहायचं.

Web Title: US-India Strategic Partnership Forum says 200 manufactring companies might shift to Indianfrom China.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.