"10 कोटी नागरिकांना 100 दिवसांत देणार कोरोना लस", ज्यो बायडन यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:51 PM2020-12-10T12:51:31+5:302020-12-10T12:51:45+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहाकोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे.
महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. तसेच मास्क वापरणे सर्वांसाठी अनिवार्य करण्यात येईल व बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही म्हटलं आहे.
"आपण एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले असून यातील तज्ज्ञ अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढतील तसेच, आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील" असा विश्वास बायडन व्यक्त केला आहे. "फायझर व मॉडर्ना यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार ट्रम्प प्रशासनाने लशींची खरेदी करण्यास सुरुवात करावी. तसेच, अमेरिकी नागरिक व जगभरातील देशांना या लशी पुरवण्यासाठी आवश्यक उत्पादन करण्याचेही या कंपन्यांना सूचित करावे. या प्रकारे कार्यवाही झाल्यास माझ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लस देणे शक्य होईल" असं म्हटलं आहे.
आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण न सापडण्यामागे "हे" आहे महत्त्वाचं कारणhttps://t.co/52eU6r756H#coronavirus#CoronaVirusUpdates#India
— Lokmat (@MiLOKMAT) December 10, 2020
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार!
अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. तसेच कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. येथील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठं विधान केलं आहे.
CoronaVirus News : तब्बल 4,93,430 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, 35 जण कोरोना संक्रमित https://t.co/JoLIjhubw2#coronavirus#student#Exam
— Lokmat (@MiLOKMAT) December 4, 2020
कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. "जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. तसेच "लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल."
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवरhttps://t.co/63UCymwjbX#coronavirus#CoronaVirusUpdates#America
— Lokmat (@MiLOKMAT) December 4, 2020