दरवाजा तोडून आत गेला, मारहाण करून गर्लफ्रेन्डची केली हत्या; द्यावे लागतील ११५ कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:45 PM2022-05-09T12:45:54+5:302022-05-09T12:47:50+5:30
US : ही घटना अमेरिकतील आहे. ईअरडली लव हिची हत्या केल्याप्रकरणी जॉर्ज हुगली वी सध्या तुरूंगात २३ वर्षांची शिक्षा भोगत आहे. २०१२ मध्ये क्रिमिनल ट्रायल दरम्यान तो दोषी आढळून आला होता.
US : एका तरूणाने मारहाण करून त्याची गर्लफ्रेन्डची हत्या केली होती. या प्रकरणी दोषी आढळल्यावर तरूणाला २३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता १२ वर्षांनंतर कोर्टाने याप्रकरणी एक नवा निर्णय दिला आहे. कोर्टाने तरूणाला गर्लफ्रेन्डच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून साधारण ११५ कोटी रूपये देण्याचा आदेश दिला आहे.
ही घटना अमेरिकतील आहे. ईअरडली लव हिची हत्या केल्याप्रकरणी जॉर्ज हुगली वी सध्या तुरूंगात २३ वर्षांची शिक्षा भोगत आहे. २०१२ मध्ये क्रिमिनल ट्रायल दरम्यान तो दोषी आढळून आला होता. हुगली आणि लव दोघेही यूनिव्हर्सिटी ऑफ वर्जीनियासाठी लॅक्रोस खेळत होते. दोघेही दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण ३ मे २०१० ला लव तिच्या अपार्टमेंटमध्ये मृत आढळून आली होती. तिची हत्या करण्यात आली होती.
यानंतर एका सिविल केसमध्ये लवच्या हत्येसाठी हुगलीला दोषी ठरवण्याची आणि नुकसान भरपाई म्हणून २२७ कोटी रूपये देण्याची मागणी पुढे आली. ज्यानंतर ज्युरीने नुकसान भरपाई म्हणून लवची आई, शेरोन लव आणि तिची बहीण लेक्सी लव होजेसला ५७-५७ कोटी रूपये देण्याचा निर्णय दिला. हा आदेश आता लवच्या मृत्यूच्या १२ वर्षानी आला.
ट्रायल दरम्यान हुगलीचे वकील मॅथ्यू ग्रीन यांनी मान्य केलं की, हुगलीमुळे लवचा मृत्यू झाला आणि तिच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळायला हवी. पण ग्रीन म्हणाले की जेव्हा हुगली लवच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला तेव्हा फार जास्त नशेत होता. हुगली तिथे लवला मारण्यासाठी गेला नव्हता.
तेच लवच्या परिवाराच्या वकिलाने सांगितलं की, हुगली आणि लवचं रिलेशनशिप चांगलं सुरू नव्हतं. हुगलीच्या नशेच्या सवयीने दोघांचं नातं बिघडवलं. ते म्हणाले की, हुगलीने लवच्या बेडरूमचा दरवाजा ठोकून ठोकून तोडला. यानंतर लवला मारहाण केली आणि मग तिला अपार्टमेंटमध्ये सोडून निघून गेला. मेडिकल एक्जामिनरने सांगितलं की, लवचा मृत्यू डोक्याला गंभीर मार लागल्याने झाला.
लवच्या परिवाराच्या वकिलाने सांगितलं की, ज्यूरीच्या निर्णयाने हे सिद्ध केलं की, नशेचं कारण देत तुम्ही कुणासोबत मारहाण करू शकत नाही. हुगलीने शेवटी लवची आई आणि तिच्या बहिणीची हत्येबद्दल माफी मागितली.