कमाल! ब्रेन डेड व्यक्तीला लावली डुकराची किडनी, अमेरिकन डॉक्टरांनी केला मोठा 'चमत्कार'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:25 PM2022-01-21T12:25:11+5:302022-01-21T12:26:37+5:30
हे ऑपरेशन यूनिव्हर्सिटी ऑफ अलबामामध्ये करण्यात आलं. याआधी डॉक्टरांनी डुकराचं हृदय मनुष्यात यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं.
अमेरिकन (America) डॉक्टरांनी पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. त्यांनी मेडिकल इतिहासात पहिल्यांदाच जेनेटिकली मॉडिफाइड डुकराच्या दोन्ही किडनी (Genetically-Modified Pig Kidneys) एका ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लांट केल्या आहेत. हे ऑपरेशन यूनिव्हर्सिटी ऑफ अलबामामध्ये करण्यात आलं. याआधी डॉक्टरांनी डुकराचं हृदय मनुष्यात यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं.
काम करत आहेत दोन्ही किडनी
WION मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, ५७ वर्षीय जिम पार्सन्सचा गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये एक अपघात झाला होता. यानंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा पार्सन्स परिवारासोबत ऑपरेशनबाबत चर्चा केली तर ते तयार झाले. यानंतर रूग्णाला डुकराच्या दोन्ही किडनी लावण्यात आल्या. असं सांगितलं जात आहे की, किडन्यांनी ट्रान्सप्लांटनंतर लगेच योग्य प्रकारे काम सुरू केलं आहे.
याआधीही केली होती कमाल
याआधी डॉक्टरांच्या एका टीमने ५७ वर्षीय व्यक्तीत जेनेटिकली मॉडफाइड डुकराचं हृदय यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं. मेडिकल इतिहासात पहिल्यांदाच असं झालं होतं आणि असं मानलं जात आहे की, याने अवयव दानाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यात मदत मिळेल. यूनिव्हर्सिट ऑफ मेरीलॅंड मेडिकल स्कूलने या संबंधी सांगितलं होतं की, ट्रान्सप्लांटनंतर रूग्ण पूर्णपणे बरा आहे.
अवयव दानासाठी वेटींग लिस्ट
असं असलं तरी हार्ट ट्रान्सप्लांटनंतरही रूग्णाच्या आजारावर उपचार निश्चित नाही. पण ही सर्जरी प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये ट्रान्सप्लांटबाबत मोठी कामगिरी आहे. डेविड बेनेट नावाच्या रूग्णामध्ये गंभीर आजार आणि वाईट आरोग्यामुळे मनुष्याचं हृदय ट्रान्सप्लांट केलं जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यााल जेनेटिकली मॉडिफाइड डुकराचं हृदय लावलं. दरम्यान अमेरिकेत कमीत कमी १० हजार रूग्ण अवयव दानाच्या वेटींग लिस्टमध्ये आहेत.