अमेरिकेने ISIS चा म्होरक्या अबू सैय्यदला केलं ठार

By Admin | Published: July 15, 2017 10:55 AM2017-07-15T10:55:33+5:302017-07-15T10:57:18+5:30

अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरियाचा (इसीस) म्होरक्या अबू सैय्यद अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे

US killed ISIS commander Abu Sayyed | अमेरिकेने ISIS चा म्होरक्या अबू सैय्यदला केलं ठार

अमेरिकेने ISIS चा म्होरक्या अबू सैय्यदला केलं ठार

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 15 - अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरियाचा (इसीस) म्होरक्या अबू सैय्यद अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा मुख्यालय पेंटागनकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेंटागनच्या प्रवक्त्या डेना व्हाईट यांनी यासंबंधी स्टेटमेंट जारी केलं आहे. मंगळवारी अमेरिकेच्या लष्कराकडून अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात बॉम्बहल्ला करण्यात आला. याच ठिकाणी इसीसीचं मुख्यालयदेखील आहे. या हवाई बॉम्बहल्ल्यातच अबू सैय्यद ठार झाला आहे. 
 
भारतीय उपखंडात अल कायदा अति सक्रिय
 
या हल्ल्यात इसीसचे अजून काही दहशतवादीही मारले गेले आहेत. इराक आणि सीरियामधील पकड हलकी पडल्यापासून इसीस अफगाणिस्तानमध्ये आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. सैय्यद आणि इतर दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्या कारणाने इसीसला मोठा धक्का बसेल आणि सोबतच अफगाणिस्तान व केंद्रीय आशियामध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी आखलेली रणनीतीही प्रभावित होईल असा दावा पेंटागनने केला आहे.
 
इसीसमोर फक्त अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकन लष्कराचं आव्हान नसून आधीपासूनच सक्रिय असलेल्या तालिबानलाही सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वेळापासून तालिबान आणि इसीसदरम्यान रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. तालिबानचा पराभव करत इसीसला आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे.
 
गेल्या 12 महिन्यांमध्ये अमेरिकेच्या सैन्यांनी अफगाणिस्तानात अबू सैय्यदसोबत इसीसच्या तीन मोठे मोहरे टिपले आहेत. या सर्वांनी त्यांनी मृत्यूच्या हवाली केलं. पेंटागनने दिलेल्या माहितीनुसार, "जुलै 2016 रोजी अमेरिका आणि अफगाणिस्तान लष्कराने संयुक्त कारवाई करत इसीस-के चा म्होरक्या हाफिज सईदला ठार केलं होतं. हाफिज सईदच्या मृत्यूनंतर अब्दल हासिबवर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. एप्रिल 2017 रोजी हासिबदेखील ठार झाला. यानंतर अबू सैय्यदने नेतृत्व स्वीकारलं होतं". एप्रिल महिन्यात संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत इसीसचे अन्य काही मोठे दहशतवादी आणि जवळपास 35 हल्लेखोर मारले गेले होते. या ऑपरेशनमध्ये अमेरिकेचेही दोन जवान शहीद झाले. 
 
गेल्या काही काळापासून अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानात इसीसवर निशाणा साधत आहे. अफगाणिस्तानात सैन्य कारवाई करणा-या अमेरिका आणि नाटो सेनेचे कमांडर जनरल जॉन निकॉलसन यांनी सांगितलं आहे की, यावर्षाच्या अखेरपर्यंत इसीसला पुर्णपणे संपवण्यात येईल. 
 

Web Title: US killed ISIS commander Abu Sayyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.