स्वत:ला देव म्हणत होता हा हैवान, स्वत:च्या मुलीसोबत केलं लग्न; एकूण 20 लग्ने केल्याचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:28 PM2022-12-05T12:28:45+5:302022-12-05T12:33:47+5:30
एफबीआयनुसार 2019 मध्ये 50 लोकांच्या या छोट्या ग्रुपचं नियंत्रण आपल्या हाती घेतल्यानंतर सॅमुअलने स्वत:ला पैगंबर असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आणि स्वत:च्या अल्पवयीन मुलीसोबत त्याने लग्न केलं.
अमेरिकेच्या एरिझोना प्रांतात स्वत:ला पैगंबर सांगणाऱ्या एका व्यक्तीने 20 महिलांसोबत लग्न केल्याचा खुलासा झाला आहे. त्याच्या या पत्नींपैकी एकीचं वय तर 9 वर्षे आहे. एफबीआयने खुलासा केला की, त्याच्या या 20 पत्नींमध्ये त्याच्या एका मुलीचाही समावेश आहे. या आरोपीचं नाव सॅमुअल रप्पीली बेटेमॅन आहे. सॅमुअल हा एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्या मोरमोन्स समूहाचा नेता आहे.
एफबीआयनुसार 2019 मध्ये 50 लोकांच्या या छोट्या ग्रुपचं नियंत्रण आपल्या हाती घेतल्यानंतर सॅमुअलने स्वत:ला पैगंबर असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आणि स्वत:च्या अल्पवयीन मुलीसोबत त्याने लग्न केलं. एजन्सीने सांगितलं की, सॅमुअलने कमीत कमी 20 महिलांसोबत लग्न केलं. ज्यातील जास्तीत जास्त तरूणीचं वय 15 पेक्षा कमी आहे. एफबीआयने याचाही खुलासा केला की, सॅमुअलने त्याच्या तीन पुरूष शिष्यांना त्याच्या मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते.
हे कृत्य सॅमुअल बघत होता. या मुलींपैकी एकीचं वय केवळ 12 आहे. सॅमुअलने दावा केला की, या मुलींनी ईश्वरासाठी त्यांच्या पुण्याचा त्याग केला. ईश्वर त्यांचे शरीर पुन्हा ठीक करेल. या हैवानाबाबत सप्टेंबरमध्ये खुलासा झाला होता तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. सॅमुअल अल्पवयीन मुलींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका ट्रेलरने पाठवत होता.
या ट्रेलरमध्ये बंद मुलींनी कशीतरी आपली बोटे बाहेर काढून इशारा केला आणि पोलिसांनी ते बघितलं. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. तेच सॅमुअलच्या गाडीमध्ये दोन महिला आणि दोन मुली आढळून आल्या. त्यासोबतच ट्रेलरमध्ये तीन मुली आढळून आल्या. या सगळ्यांची वयं 11 ते 14 दरम्यान आहेत. तेव्हाच सॅमुअलला अटक करण्यात आली. त्याला नंतर जामीन मिळाला तेव्हा तो पुरावे नष्ट करू लागला होता. मग त्याला पुन्हा अटक केली गेली. आता एफबीआय आरोपीच्या ठिकाणांवर छापे मारत आहे.