CoronaVirus News : लढ्याला यश! "या" देशात डिसेंबरमध्ये उपलब्ध होणार Corona Vaccine, आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 04:47 PM2020-11-11T16:47:15+5:302020-11-11T16:58:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. अमेरिकेसारखा मोठा देशही व्हायरसपुढे हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स अजार यांनी कोरोना लसीसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे.
अमेरिकेत डिसेंबर महिन्यात कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. फायजरने विकसित केलेल्या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. फायजर कंपनी आपल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष आरोग्य प्राधिकरणाला लवकरात लवकर सोपवू शकतात. अमेरिकेत सरकार लस देण्याच्या मोहिमेची तयारी करत असल्याची माहिती एलेक्स अजार यांनी दिली आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील रुग्णांच्या संख्येने ओलांडला 5 कोटींचा टप्पा, 1,263,111 लोकांनी गमावला जीवhttps://t.co/WuZ5vYPgem#America#coronavirus#CoronaVirusUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) November 9, 2020
कोरोना लसीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार
"सरकारला दर महिन्याला फायजरने विकसित केलेल्या लसीचे जवळपास दोन कोटी डोस उपलब्ध होतील. अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात कोरोना लसीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार झाला असून 50 मिलियन नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. लसीबाबतचा अंतिम निर्णय हा चाचणीचा रिझल्ट कसा आहे यावर असणार आहे. तसेच सर्वात पहिला डोस हा नर्सिंग होममधील वृद्धांना देण्यात येणार आहे" असं देखील अजार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळhttps://t.co/c01OZyool6#coronavirus#CoronaVirusUpdates#Corona
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2020
भय इथले संपत नाही! कोरोनापुढे अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर
अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख 37 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला आहे.