अमेरिका चीनबरोबरचे सर्व व्यापारीसंबंध तोडण्याची शक्यता, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 10:33 PM2020-08-23T22:33:42+5:302020-08-23T22:40:56+5:30
या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार.
वॉशिंग्टन :अमेरिका आणि चीन यांच्यात जबरदस्त तणावाचे वातावरण आहे. अशातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भविष्यात चीनबरोबचे व्यापारी संबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याचीही घोषणा करू शकतात. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले आहे, की अमेरिकेची अर्थव्यवस्था चीनपासून वेगळी करण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू आहे. चीनदेखील अमेरिकन वस्तूंचा मुख्य ग्राहक आहे.
या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार.
ट्रम्प म्हणाले, त्यांनी चीनसोबतचे व्यापाराचे दरवाजे बंद केले आहेत. कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळात चीनची भूमिका आणि त्याचा सामना करण्याच्या उपायांत त्याला आलेल्या अपयशामुळे ते नाराज आहेत. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या कोरोना व्हायरसचा उल्लेख 'चिनी व्हायरस' असा केला होता.
दुसरीकडे दक्षिण चीन सागरातही दोन्ही देशांतील तणाव वाढताना दिसत आहे. हा संपूर्ण तणाव भविष्यातील व्यापराच्या अटी आणि रस्त्यांवरून आहे. कारण या भागात एकट्याचे वर्चस्व निर्माण करण्याची चीनची इच्छा आहे.
यापूर्वीच ट्रम्प यांनी चिनी कंपनी टिकटॉकवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आता ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. अमेरिकेत टिकटॉकचे जवळपास 8 कोटी युझर्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा
CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!