अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:55 IST2025-02-04T10:32:13+5:302025-02-04T10:55:01+5:30

मेक्सिकोसारख्या शेजारी देशातील लोकांना अमेरिकेने विमानाने परत पाठविले होते. तिथे या विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, अखेर ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकन सरकारने या घुसखोरांना माघारी घेण्यास होकार दिला होता.

US military aircraft flew towards India with 205 immigrants; Indians brought this embarrassing moment... | अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...

अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...

अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे. मेक्सिकोसारख्या शेजारी देशातील लोकांना अमेरिकेने विमानाने परत पाठविले होते. तिथे या विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, अखेर ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकन सरकारने या घुसखोरांना माघारी घेण्यास होकार दिला होता. अशाच प्रकारे आज २०० भारतीय घुसखोरांना घेऊन अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान भारताकडे येण्यासाठी निघाले आहेत.

अमेरिकेत हे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. आज २०५ भारतीयांना अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले आहे. ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे. 

रिपोर्टनुसार अमेरिकेचे सी-१७ हे विमान या अवैध लोकांना घेऊन निघाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना कळविले आहे. १८ हजार पेक्षा जास्त भारतीय लोक अमेरिकेत अवैधरित्या राहत आहेत. या लोकांचा व्हिसा संपला आहे किंवा ते अवैधरित्या अमेरिकेत दाखल झाले आहेत. 

टेक्सासमधील एल पासो आणि कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथून ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.लष्करी विमानांद्वारे स्थलांतरितांना ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे पाठवण्यात आले आहे, असे पेंटागॉनने म्हटले आहे. 

भारताने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या बाबतीत अमेरिकन प्रशासनाला मदत करण्याची ऑफर दिली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते की भारत या प्रकरणात अमेरिकेला मदत करण्यास तयार आहे. यानंतरचे हे पहिले उड्डाण आहे. 

Web Title: US military aircraft flew towards India with 205 immigrants; Indians brought this embarrassing moment...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.