अमेरिकेच्या सैनिकी विमानाला अपघात, 16 जणांचा मृत्यू
By admin | Published: July 11, 2017 09:53 AM2017-07-11T09:53:12+5:302017-07-11T10:55:17+5:30
मिसिसिपीमध्ये अमेरिकेच्या एका लष्करी विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 11 - अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये एका लष्करी विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीन कॉर्पचं USMC KC-130 विमान मिसिसिपीतील LeFlore County परिसरात क्रॅश झाले. विमान दुर्घटनेबाबतची माहिती यूएस मरीननं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे दिली.
""सीएनएन""नं दिलेल्या वृत्तानुसार काउंटीचे आपात्कालीन विभागाचे प्रमुखांनी सांगितले की, विमान दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण 16 जण होते आणि त्यांचे हयात असल्याचे काहीही पुरावे हाती लागले नाहीत. दरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे दुर्घटनास्थळाच्या आसपास परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मरीन कॉर्प्सच्या प्रवक्त्यानं सांगितले की, USMC KC-130 विमानाला सोमवारी रात्री (10 जुलै ) अपघात झाला. दरम्यान ही दुर्घटना कोणत्या कारणांमुळे घडली आहे, याची माहिती अद्यापपर्यंत कळू शकलेली नाही. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जणांचा मृत्यू झाला आहे. KC-130 विमानाचा उपयोग लष्कर अनेक कामांसाठी करतं. विशेषतः कारगो किंवा सैनिकांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवणे यांसारख्या अनेक कामांसाठी या विमानाचा वापर केला जातो.
12 bodies found in Marine plane crash in Mississippi; search for others continues: AP
— ANI (@ANI_news) July 11, 2017
Marines KC-130 plane crashes in Mississippi killing at least six https://t.co/aBE5eI276cpic.twitter.com/7sJshiWHGV
— Evan Kirstel (@evankirstel) July 11, 2017
CONFIRMED: Capt. Sarah Burns with @USMC says the KC-130 in LeFlore County is theirs.
— Mike Evans (@crabblers) July 11, 2017
16 have died per EMA official: https://t.co/Hmt8M7SILSpic.twitter.com/uZEOOf9QNa