अमेरिकेचे लष्करी विमान कोसळले

By admin | Published: October 2, 2015 11:53 PM2015-10-02T23:53:38+5:302015-10-03T02:54:17+5:30

अफगाणिस्तानात तालिबानने कथितरीत्या हल्ला करून शुक्रवारी अमेरिकेचे मालवाहू विमान पाडले. यात सहा अमेरिकन सैनिकांसह ११ जण ठार झाले.

US military plane collapses | अमेरिकेचे लष्करी विमान कोसळले

अमेरिकेचे लष्करी विमान कोसळले

Next

११ ठार : तालिबानने घेतली जबाबदारी
वॉशिंग्टन/काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने कथितरीत्या हल्ला करून शुक्रवारी अमेरिकेचे मालवाहू विमान पाडले. यात सहा अमेरिकन सैनिकांसह ११ जण ठार झाले. कुंदुझ शहराच्या ताब्यावरून नाटो सैन्य आणि तालिबान दहशतवाद्यांतील संघर्ष वाढला असतानाच ही घटना घडली.
अमेरिकन हवाई दलाचे ‘सी-१३० जे’ हे विमान जलालाबादच्या हवाई तळावर कोसळून ११ जण ठार झाले. मृतांत ६ अमेरिकन जवान व पाच नागरिकांचा समावेश आहे, असे पेंटॅगॉनने सांगितले.
‘दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरूआहे. याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर ती लगेच जाहीर केली जाईल,’ असे सांगून पेंटॅगॉनने दुर्घटनेमागील कारणास दुजोरा देणे टाळले. तथापि, तालिबानने विमान पाडण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: US military plane collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.