रशियाला पराभूत करण्यासाठी अमेरिकेने खजिना उघडला! सहा देशांवर खर्च केलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम एकट्या युक्रेनला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 08:47 PM2023-02-24T20:47:52+5:302023-02-24T20:48:05+5:30
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युद्धाची औपचारिक सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई मानतात.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युद्धाची औपचारिक सुरुवात झाली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई मानतात.
रशियन हल्ल्याला पाश्चात्य देश कडाडून विरोध करत आहेत. अमेरिका आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत.
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह ४० देश रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मदत करत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून हे देश युक्रेनला सातत्याने लष्करी मदत करत आहेत. अमेरिका युक्रेनला विशेष मदत करत आहे.
२०२० मध्ये अमेरिकेने फक्त एका वर्षात युक्रेनला सहा देशांना जितकी लष्करी मदत दिली होती, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लष्करी मदत दिली आहे. २०२० मध्ये अमेरिकेने युक्रेनला २८४ मिलियन डॉलर, जॉर्डनला ५०४ मिलियन डॉलर, इराकला ५४८ मिलियन डॉलर, १.३ अब्ज इजिप्त, २.८ अब्ज अफगाणिस्तान, ३.३ अब्ज इस्रायलला लष्करी खर्चासाठी दिले. म्हणजेच २०२० मध्ये अमेरिकेने या देशांना एकूण ८.७ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली. युद्ध सुरू झाल्यापासून, अमेरिकेने युक्रेनला फक्त ४६.६ अब्ज दिले आहेत.
कंगाल पाकिस्तानने मोडले रोहित शर्माचे रेकॉर्ड? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी १०३५ रणगाडे आणि चिलखती वाहने, २३६ तोफ आणि वैमानिकांसह २० विमाने दिली आहेत.
युक्रेनला युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिकेने दिलेल्या एकूण पैशांपैकी सुमारे ६० टक्के रक्कम रशियाविरुद्ध लढण्यासाठी देण्यात आली आहे. १५ जानेवारी २०२३ पर्यंत, युक्रेनला युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने सुमारे ७६ अब्ज दिले आहेत. त्यापैकी ४६.६ अब्ज डॉलर्स फक्त युद्धासाठी देण्यात आले आहेत. त्या पैशातून शस्त्रे खरेदी केली आहेत, सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे.
लष्कराव्यतिरिक्त अमेरिकेने युक्रेनची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि अन्नासाठीही पैसे दिले आहेत. पण लष्करी खर्चाच्या तुलनेत ते फारच कमी आहे. आर्थिक मदतीच्या बाबतीत, युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने युक्रेनला २६.४ अब्ज दिले आहेत. मानवतावादी मदतीसाठी फक्त ३.९ डॉलर अब्ज दिले आहेत.