India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:02 AM2020-07-07T08:02:53+5:302020-07-07T08:07:05+5:30

जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे.

us military to stand strong with india in indian china border conflict white house official | India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून लडाखच्या LACवर चीन आणि भारताचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर भारतानंही चीनला जशास तसे उत्तर देण्याचं रणनीती आखली आहे. गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या LACवर चीन आणि भारताचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर भारतानंही चीनला जशास तसे उत्तर देण्याचं रणनीती आखली आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे.

वॉशिंग्टनः गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या LACवर चीन आणि भारताचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर भारतानंही चीनला जशास तसे उत्तर देण्याचं रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे चीनविरोधातील या संघर्षांत अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आलेले आहेत. चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. त्यांच्या भूमीत चीन सातत्यानं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा देशांनी आघाडी उघडली असून, भारताला समर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनीही भारत-चीन वादात सावध पवित्रा घेतला होता. पण आता अमेरिकेनं उघड उघड भारताला समर्थन दिलं आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे. चीनला आशियात दादागिरी करू देणार नसल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसच्या या घोषणेच्या थोड्या वेळानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर निशाणा साधला आहे.  चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाला खूप नुकसान सोसावं लागलं, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. 

व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात फॉक्स न्यूजला सांगितले की, आम्ही चीन किंवा इतर कोणत्याही देशाला सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावी शक्ती म्हणून स्वीकारणार नाही, हा संदेश स्पष्ट आहे. अमेरिकेच्या नौदलाने या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर अधिका-यांनी हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले की, "चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाचे प्रचंड नुकसान झाले." कोरोना विषाणूच्या साथीमुळे अमेरिका, संपूर्ण युरोप आणि भारतासह जगातील इतर देशांची अर्थव्यवस्था जवळजवळ ठप्प झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात चीनने कोरोनाविषयी माहिती का दिली नाही आणि विषाणू जगभर का पसरवू दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन सैन्य
मिडोज यांनी सांगितले की, अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात पाठवल्या आहेत. अमेरिका ही जगातील सर्वोत्तम शक्ती आहे हे जगाला ठाऊक असेल हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन समुद्रात प्रादेशिक वाद उकरून काढत असतो. चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर दावा करतो. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांच्या भागावर हक्क सांगतो, असंही मिडोज म्हणाल आहेत. मिडोज यांनी भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णय योग्य असल्याचा उल्लेख केला आहे. 

हेही वाचा

जगात टाळेबंदी; पोस्टात मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास असलेल्यांनी आजच अर्ज करा

चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका

Web Title: us military to stand strong with india in indian china border conflict white house official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.