कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 08:55 AM2020-01-11T08:55:33+5:302020-01-11T09:09:54+5:30

US-Iran Tension : अमेरिकेच्या लष्कराने यमनमध्ये एअरस्ट्राइकची योजना आखली होती.

Us Military Tried But Failed To Take Out Another Senior Iranian Commander Abdul Reza Shahlai In Yemen | कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

Next

वॉशिंग्टन : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार केले. या हल्लानंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. यातच अमेरिकेने आणखी एक दावा केला आहे. कासीम सुलेमानी यांच्यावर ड्रोन हल्ला ज्या दिवशी केला, त्याच दिवशी आणखी एक एअरस्ट्राइक केला होता, त्यामध्ये इराणच्या कुद्स फोर्सचा एक वरिष्ठ अधिकारी निशाण्यावर होता. मात्र, अमेरिकेचे हे मिशन अयशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी केला आहे. 

अमेरिकेतील मीडिया वॉशिंग्टन पोट्सने चार अधिकाऱ्यांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लष्कराने यमनमध्ये एअरस्ट्राइकची योजना आखली होती. ज्यामध्ये इराण रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे खनिजदार आणि कुद्स फोर्सचे उच्च स्तरीय अधिकारी अब्दुल रजा शहलाई यांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या लष्कराचे हे मिशन अयशस्वी ठरले.  या मिशनची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर  अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी आणि अब्दुल रजा शहलाई हे दोघेही अमेरिकेच्या टार्गेट लिस्टवर होते, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने इराणच्या कुद्स फोर्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.  

कासीम सुलेमानी आणि इराकी शिया मिलिशिया ग्रुपचे डेप्युटी कमांडर अबु महदी अल मुहंदिस यांना गेल्या 3 जानेवारीला बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून ठार केले होते. याबाबत अमेरिकेने स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासीम सुलेमानी हे अमेरिकेच्या दूतावासाशिवाय विविध दुसऱ्या संघटनांवर हल्ला करण्याची योजना आखत होते. त्यानंतर त्यांना अमेरिकेने हवाई हल्ला करून ठार केले.

कासीम सुलेमानी आणि इराकी शिया मिलिशिया ग्रुपचे डेप्युटी कमांडर अबु महदी अल मुहंदिस यांना गेल्या 3 जानेवारीला बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून ठार केले होते. याबाबत अमेरिकेने स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासीम सुलेमानी हे अमेरिकेच्या दूतावासाशिवाय विविध दुसऱ्या संघटनांवर हल्ला करण्याची योजना आखत होते. त्यानंतर त्यांना अमेरिकेने हवाई हल्ला करून ठार केले.

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने आगळीक केल्यास त्यांची 52 ठिकाणे उद्ध्वस्त केली जातील, असा इशारा दिला होता. त्यानंतर इराणकडून ट्रम्प यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देण्यात आले असून, अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या 140 ठिकाणांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा इराणच्या कुद्स फोर्सने दिला आहे. 

(अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा)

(US-Iran Tension : तणाव निवळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने भारताकडे मागितला मदतीचा हात)

(इराणच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करू -ट्रम्प)

Web Title: Us Military Tried But Failed To Take Out Another Senior Iranian Commander Abdul Reza Shahlai In Yemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.