अमेरिकन नेव्हीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा; UFOचे अनेक व्हिडीओज, पण जगाला दाखवू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:50 PM2022-09-13T15:50:17+5:302022-09-13T15:50:34+5:30

यूएस सरकारची वेबसाइट ब्लॅक व्हॉल्टने यूएस नेव्हीला माहिती स्वातंत्र्य कायदा (एफओआयए) विनंती करून सर्व यूएफओचे व्हिडिओ जाहीर करण्याची विनंती केली होती.

US Navy Reveals First Time; Many videos of UFOs, but can't show the world | अमेरिकन नेव्हीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा; UFOचे अनेक व्हिडीओज, पण जगाला दाखवू शकत नाही

अमेरिकन नेव्हीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा; UFOचे अनेक व्हिडीओज, पण जगाला दाखवू शकत नाही

Next

अमेरिकेच्या नौदलाने पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. परग्रहावरील युएफओंचे आपल्याकडे अनेक व्हिडीओ असून ते जगाला दाखवू शकत नाही, असे नौदलाने म्हटले आहे. युएफओंना अमेरिकी सरकार अनआयडेंटिफाईड एरिअल फेनॉमेना म्हणते. ही युएफओ जगभरात लँड होत असतानाचे व्हिडीओ आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 

व्हिडिओ जारी केल्याने त्यांच्या देशाला धोका पोहोचू शकतो, असे अमेरिकी नौदलाला वाटत आहे. यामुळे त्यांना UFO व्हिडिओंशी संबंधित रहस्ये लपविण्यामध्येच हित असल्याचे वाटत आहे. 2020 मध्ये, यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने यूएफओचे तीन व्हिडिओ जारी केले होते. यातील काही क्लिपिंग कोणत्या ना कोणत्या माध्यमात लीक झाल्या होत्या. त्यामुळे नौदलाला हे व्हिडिओ सार्वजनिक करणे भाग पडले होते. 

यूएस सरकारची वेबसाइट ब्लॅक व्हॉल्टने यूएस नेव्हीला माहिती स्वातंत्र्य कायदा (एफओआयए) विनंती करून सर्व यूएफओचे व्हिडिओ जाहीर करण्याची विनंती केली होती. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नौदलाने एफओआयएची विनंती नाकारली आहे. नौदलाने अधिक व्हिडिओ रिलीझ करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. 
नौदलाच्या एफओआयए कार्यालयाचे उपसंचालक ग्रेगरी कॅसन यांनी सांगितले की, ज्या व्हिडीओ रिलीझ करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यात वर्गीकृत डेटा आहे, जो आम्ही सार्वजनिक करू शकत नाही. ही माहिती समोर आल्याने देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या व्हिडिओंचा कोणताही भाग सार्वजनिक करता येणार नाही. जे तीन व्हिडीओ जारी केले गेले त्यातील काही भाग लीक झाला होता, प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला होता. यामुळे नागरिक आवाज उठवत होते. 

तिन्ही व्हिडिओ रिलीझ झाल्यानंतर प्रथमच, UFO दिसण्यावरून चर्चा करण्यासाठी एक ओपन हाऊस उपसमिती स्थापन करण्यात आली. गेल्या वर्षी, राष्ट्रीय गुप्तचर संचालकांच्या कार्यालयातून UFOs दिसण्याबाबत काही प्रकाशन जारी करण्यात आले होते. ही माहिती अमेरिकी सरकार लपवून ठेवते. 

Web Title: US Navy Reveals First Time; Many videos of UFOs, but can't show the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.