चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 08:39 PM2020-07-19T20:39:56+5:302020-07-19T20:42:22+5:30
हिंदी महासागरात चीन करत असलेल्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आपले तीन एअरक्राफ्ट कॅरिअर्स या भागात तैनात केले आहेत.
वॉशिंग्टन - चीनसोबत तणाव सुरू असतानाच अमेरिकेने दक्षिण चीन सागरापासून हिंदी महासागरापर्यंत गस्त वाढवली आहे. चीनच्या जवळच दक्षीण चीन सागरात युद्धाभ्यास संपवून अमेरिकन नौदलाचे एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस निमित्झ आता अंदमान निकोबार बेटांजवळ पोहोचले आहे. या भागात भारतीय नौदल आधीपासूनच युद्धाभ्यास करत आहे.
आशियात अमेरिकेचे तीन एअरक्राफ्ट कॅरिअर तैनात -
हिंदी महासागरात चीन करत असलेल्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आपले तीन एअरक्राफ्ट कॅरिअर्स या भागात तैनात केले आहेत. सध्या यातील एक यूएसएस रोनाल्ड रिगन दक्षीण चीन सागरात, तर यूएएसएस थियोडोर रुझवेल्ट फिलिपिन्स सागराच्या जवळपास गस्त घालत आहे. अता अमेरिकेने अवलंबलेल्या या आक्रमक धोरानामुळे संतापलेला चीन सातत्याने युद्धाची धमकी देत आहे.
यूएसएस निमित्झ किती शक्तीशाली -
अमेरिकेच्या सुपरकॅरियर्समधील यूएसएस निमित्झ अत्यंत शक्तीशाली मानले जाते. अणूशक्तीने चालणाऱ्या या एअरक्राफ्ट कॅरिअरला 3 मे 1975 रोजी अमेरिकन नौदलात सामील करण्यात आले. हे कॅरिअर स्टाइक ग्रुप 11 चा भागा आहे, जे स्वत:च्या बळावर अनेक देशांना उद्ध्वस्त करू शकते. 332 मीटर लांब असलेल्या या एअरक्राफ्ट कॅरिअरवर 90 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सशिवाय नौदलाचे जवळपास 3000 सैनिक तैनात असतात.
कधीकाळी भारताविरोधात युद्धासाठी पोहोचला होता अमेरिकेचा सातवा ताफा -
एयरक्राफ्ट कॅरिअर यूएएस निमित्स अमेरिकेच्या सातव्या ताफ्यात सामील आहे. हा ताफा 1971मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बंगालच्या खाडीत आला होता. बांगलादेशात मार खात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना मदत करणे हा त्याचा हेतू होता. मात्र तेव्हा रशिया भाराताच्या बाजूने ठेमपणे उभा होता. यामुळे अमेरिकेच्या या सातव्या ताफ्याला माघार घ्यावी लागली होता
चार देश चीनला घेरायला तयार -
आता हिंदी महासागरात भारताबरोबरच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियादेखील चीनला घेरण्यासाठी तयार आहेत. सध्या याच मार्गाने चीनचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो आणि पेट्रोलीयम पदार्थांची आयात निर्यात होते. यामुळे त्याने कुठल्याही प्रकारचे वाकडे पाऊल उचलले तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या -
पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट
चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप