Shocking! जिथे झाला होता भावाचा मृत्यू, तिथेच श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा ट्रेनखाली गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:14 PM2021-08-09T17:14:56+5:302021-08-09T17:16:47+5:30
मृतकाची नावे २९ वर्षीय पाबलो तिकीरम उस आणि २० वर्षीय जोस किलंबलम तिकीरम आहे. हे दोघेही मंगळारी सकाळी ५.१० वाजता ८२०० साउत बुलेवार्डजवळ चारलोटमध्ये रेल्वे ट्रॅकवर चालत होते.
मृत्यू कधी कुणाला येईल कुणालाच माहीत नसतं. असंच काहीसं अमेरिकेतून समोर आलं आहे. ज्याबाबत दु:खं व्यक्त केलं जात आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये दोन लोक आपल्या भावाच्या मृत्यूचा शोक करण्यासाठी त्याच ठिकाणी गेले होते ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू लाइट ट्रेनने टक्कर मारल्या कारणाने झाला होता. पण या दोघांना काय माहीत की, जे त्यांच्या भावासोबत झालं तेच त्यांच्यासोबतही होईल. पण असं झालं आणि शोक करण्यासाठी आलेल्या दोन्ही भावांचा ट्रेनखाली मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची नावे २९ वर्षीय पाबलो तिकीरम उस आणि २० वर्षीय जोस किलंबलम तिकीरम आहे. हे दोघेही मंगळारी सकाळी ५.१० वाजता ८२०० साउत बुलेवार्डजवळ चारलोटमध्ये रेल्वे ट्रॅकवर चालत होते. तेव्हाच एका ट्रेनने अचानक त्यांना जोरदार धडक दिली. ज्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधिकारी म्हणाले की, 'या दोघांच्या भावाचा मृत्यू एक आठवड्यापूर्वीच झाला होता, त्यानिमित्ताने दोघे इथे आले होते आणि जिथे त्यांच्या भावाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते'. (हे पण वाचा : Shocking! प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, होणाऱ्या पत्नीसमोरच नवरदेवाने घेतला अखेरचा श्वास)
पोलिसांनी पुढे सांगितले की, 'दुर्दैवाने या दोघांनाही ट्रेनने टक्कर दिली आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला'. मृतकांच्या २७ वर्षीय भाऊ बल्तजर तिकीरम याला २६ जुलैला ट्रेन टक्कर मारली होती. पोलिसांनी चौकशी केली तर समोर आलं की, दोन्ही भाऊ ट्रॅकवर उभे होते. तेव्हाच तिथे अडकले. पण अजून हे समजू शकलं नाही की, ट्रेन येण्याच्या किती वेळाआधीपासून ते ट्रॅकवर उभे होते. दोघेही मेणबत्ती लावत होते आणि टॅकवरच भावाला श्रद्धांजलि अर्पण करत होते.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सगळे सेफ्टी फीचर, क्रॉसिंग आर्म, लाइट आणि हॉर्न सगळं काही योग्यपणे काम करत होतं. ते म्हणाले की, 'मी याची कल्पनाही करू शकत नाही की, कुणीतरी एका आठवड्यातच आपली तीन मुले गमावली. तेही अशा दुख:द स्थितीत. मात्र, अधिकाऱ्यांना शंका आहे त्यांनी दारू प्यायली होती.