अमेरिकेची फायजर अन् मॉडर्ना लस प्रभावी, कोरोनाचा धोका 90 टक्के कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 11:07 AM2021-03-30T11:07:04+5:302021-03-30T11:07:22+5:30

अमेरिकेतील या संशोधनानुसार फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना पॉझिटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्के कमी आहे. अमेरिकेतील 4000 नागरिकांवर या लसीच्या वापरावरुन संशोधन करण्यात आलंय.

US Pfizer and Moderna vaccine effective, corona risk reduced by 90% | अमेरिकेची फायजर अन् मॉडर्ना लस प्रभावी, कोरोनाचा धोका 90 टक्के कमी

अमेरिकेची फायजर अन् मॉडर्ना लस प्रभावी, कोरोनाचा धोका 90 टक्के कमी

Next
ठळक मुद्देअमेरिकेतील या संशोधनानुसार फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना पॉझिटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्के कमी आहे.

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येत असून जगभराताली कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जाणवत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, आता अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना या लसीसंदर्भात चांगली बातमी पुढे आली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या या संशोधन अहवालानुसार या दोन्ही लसीचा पहिला डोस चांगलाच परिणामकारक ठरला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना संक्रमण होण्याची शक्यता 80 टक्के कमी असते. 

अमेरिकेतील या संशोधनानुसार फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना पॉझिटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्के कमी आहे. अमेरिकेतील 4000 नागरिकांवर या लसीच्या वापरावरुन संशोधन करण्यात आलंय. आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्करचाही लसीकरण केलेल्या या 4 हजार रुग्णांमध्ये समावेश आहे. यूस एस सेंटरर्स फॉर डीजीस कंट्रोल अँड प्रिवेशनने हे संशोधन केले आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी ही लस किती प्रभावशाली आहे, हा निष्कर्ष या संशोधनाच्या माध्यमातून करण्यात आलाय. सीडीसीचे संचालक रोशल वेलेंस्की यांनी म्हटले की, लसीकरणाचा आपला प्रयत्न यशस्वी होत असल्याचं या संशोधनातून दिसून येतय.

14 डिसेंबर 2020 से 13 मार्च 2021 या कालावधीत हे संशोधन करण्यात आलंय. सोमवारी या संशोधनाचा निष्कर्ष जारी करण्यात आला. या संशोधनासाठी दोन्ही कंपन्यांनी क्लिनीकल ट्रायल्सच्या डेटाचाही उपयोग केलाय. दरम्यान, भारतातही फायजर आणि मॉडर्नाच्या लसीला मान्यता मिळाली नाही. देशात सीरम इंस्टीट्यूटची कोवीशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस वापरण्यात येत आहे. 

यापूर्वी जाणले होते साईड इफेक्ट

फायजरच्या व्हॅक्सीनवर सुरुवातीला 3 महिने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.  फिनलँड आणि बुल्गारिया येथे या लसीचे साईड इफेक्ट जाणवले होते. ड्रग एजेंसी चे एग्सीक्यूटीव्ह डायरेक्टर बॉग्डन किरिलोव यांनी म्हटले होते, बुल्गारियात ज्या 4 नागरिकांना लसीचे साइड इफेक्ट दिसून आले, त्यापैकी दोघांनी त्रास होत असल्याची आणि इतर दोघांनी सुस्ती व ताप चढत असल्यची तक्रार केली होती. फिनलँड येथेही 5 जणांना या लसीचे साईड इफेक्ट जाणवले होते. 

Web Title: US Pfizer and Moderna vaccine effective, corona risk reduced by 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.