CoronaVirus News: चीनला धडा शिकवण्यासाठी मेगाप्लान?; ट्रम्प यांच्याकडून मोदींना विशेष निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 09:54 PM2020-06-02T21:54:42+5:302020-06-02T22:19:25+5:30

दोन्ही देशांच्या प्रमुखांकडे फोनवर चर्चा; कोरोना संकटासह विविध मुद्द्यांवर भाष्य

us president donald trump had conversation with pm modi extends invitation to attend G 7 Summit | CoronaVirus News: चीनला धडा शिकवण्यासाठी मेगाप्लान?; ट्रम्प यांच्याकडून मोदींना विशेष निमंत्रण

CoronaVirus News: चीनला धडा शिकवण्यासाठी मेगाप्लान?; ट्रम्प यांच्याकडून मोदींना विशेष निमंत्रण

Next

नवी दिल्ली: जागतिक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. फोनवरील संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी मोदींना जी-७ राष्ट्रांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण दिलं. भारत जी-७ चा भाग नाही. मात्र ट्रम्प यांनी भारताचा समावेश जी-७मध्ये करण्याची इच्छा मोदींकडे व्यक्त केली.


डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निमंत्रणावर मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनानंतरच्या काळात अशा मजबूत संघटनेची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले. जी-७ परिषदेत अमेरिका आणि इतर देशांसोबत काम करणं भारतासाठी निश्चितच आनंदाची बाब असेल, असं मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधानांनी अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. परिस्थिती लवकरत सुधारेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. जॉर्ज फ्लॉयर्ड नावाच्या एका कृष्णवर्यीय व्यक्तीचा पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्याचा आरोप असून त्याविरोधात अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सध्या आंदोलनं सुरू आहेत.







पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादावरही चर्चा झाली. चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी दर्शवली होती. मात्र हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं म्हणत भारतानं मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला होता. 







ट्रम्प यांनी मोदींसोबतच्या संभाषणात फेब्रुवारी महिन्यातील भारत दौऱ्याचाही उल्लेख केला. भारतात झालेल्या शानदार स्वागताच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. हा दौरा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय होता. यामुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ झाले, असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं. 

Web Title: us president donald trump had conversation with pm modi extends invitation to attend G 7 Summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.