"माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही"; भारतावर टेरिफ आकारण्यावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:21 IST2025-02-19T16:19:34+5:302025-02-19T16:21:44+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या मुद्द्यावरुन भारताबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

US President Donald Trump is adamant on levying equal tariffs on India | "माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही"; भारतावर टेरिफ आकारण्यावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

"माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही"; भारतावर टेरिफ आकारण्यावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

Donald Trump Tariff Wars : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने सगळ्या जगाची चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी शेजारच्या कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के टेरिफ लागू केला आहे. ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी चीनवरही १० टक्के अतिरिक्त टेरिफ लागू केला. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प भारतावर टेरिफ आकारण्यावर ठाम आहेत. कोणीही माझ्याशी वाद घालू शकत नाही, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर समान आयात शुल्क आकारण्यावर ठाम आहेत. अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनच्या करांमधून भारताला वगळले जाणार नाही, असं म्हटलं आहे. यावेळी ट्रम्प यांनी जागतिक व्यापार आणि अमेरिकाच्या भागीदारांसाठी असलेल्या कर रचनेच्या बदलाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 

तसेच ट्रम्प यांनी नुकत्याच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेरिफच्या मुद्द्यावर झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला. वॉशिंग्टनच्या परस्पर शुल्कातून भारताला सोडले जाणार नाही,  भारत जेवढे शुल्क आकारते तेवढेच अमेरिकेकडूनही आकारले जाईल असं ट्रम्प म्हणाले.

"मी काल पंतप्रधान मोदींना सांगितले की जसं तुम्ही करणार तसंच मीही करेन. तुम्ही जे काही शुल्क आकाराल ते मीही आकारेन," असं ट्रम्प म्हणाले. यावर पंतप्रधान मोदींनी मला ते आवडणार नाही, असं म्हटलं. यावर उत्तर देत, "तुम्ही जे काही शुल्क आकारता, ते शुल्क मी आकारणार आणि मी प्रत्येक देशासोबत तेच करत आहे," असं ट्रम्प म्हणाले.

यावेळी मस्क यांनी भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर भारतात १०० टक्के शुल्क आहे, असं म्हटलं. यावेळी मस्क यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राचाही उल्लेख केला. यावर ट्रम्प यांनी हे खूप जास्त असल्याचं म्हटलं. जर अमेरिकन कंपन्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारले नाहीत तर अशा करांमुळे भारतात विक्री करणे अशक्य होईल, असं म्हटलं.
 
"माझ्याशी कोणीही वाद घालू शकत नाही. जर मी २५ टक्के म्हंटले तर ते म्हणतील ते भयंकर आहे असं म्हणतील. पण मी आता असे म्हणणार नाही. कारण ते जे काही शुल्क आकारतात तेच आम्ही आकारणार आहोत," असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भारताशी टेरिफवरून वाद घालण्याची ट्रम्प यांनी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्काचा उल्लेख करून भारताला टेरिफ किंग असं म्हटलं होतं.
 

Web Title: US President Donald Trump is adamant on levying equal tariffs on India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.