CoronaVirus vaccine : याच वर्षी 3 नोव्हेंबरपर्यंत तयार होऊ शकते अमेरिकन कोरोना लस, ट्रम्प म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 03:50 PM2020-08-07T15:50:55+5:302020-08-07T15:59:06+5:30
अमेरिक कंपनी मॉडर्नानेदेखील दावा केला आहे, की ते लवकरच ही लस तयार करतील. तसेच या लसीमुळे कुणालाही कोरोनाची लागन होणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.
वॉशिंग्टन -अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि भारतासह जगातील अनेक देश सध्या आपापल्या कोरोना लसींचे मानवी परीक्षण करत आहेत. कोरोना लस तयार करण्याची सर्वत्र स्पर्धा सुरू असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात, या वर्षी 3 नोव्हेंबरपर्यंत कोरोना लस येण्याची आशा व्यक्त केली आहे.
ट्रम्प गुरुवारी म्हणाले, या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होईल, अशी मला आशा आहे. एवढेच नाही, तर ही लस अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजेच 3 नोव्हेंबरपर्यंत तयार होऊ शकते. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका असतानाच ही लस आल्याने त्याचा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. या मोहिमेचा उद्देश नागरिकांचा जीव वाचवणे आहे. या पूर्वीही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एका सभेत याचे संकेत दिले होते. त्यावेळीही ते म्हणाले होते, 2020च्या अखेरपर्यंत आम्ही कोरोनावरली लस तयार करू.
मॉडर्ना(Moderna) ही अमेरिकन कंपनी कोरोना लस तयार करत आहे. या कंपनीची लस सध्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. मानवी परीक्षणादरम्यान शेकडो लोकांना ही लस देण्यात आली आहे. यामुळे या लसीसंदर्भात सर्वांच्याच आशा वाढल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाचेही या लसीवर खास लक्ष आहे.
NIHने आकड्यांचा खुलासा केला नाही -
NIHने 27 जुलैला सांगितले होते, की अमेरिकन वैज्ञानिकांनी एका संभ्याव्य कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यावरील मानवी परीक्षणाला सुरुवात केली आहे. mRNA-1273 असे या लसीचे नाव आहे. एवढेच नाही, तर एका अमेरिकन अधिकाऱ्याने संख्येचा स्पष्ट उल्लेख न करता शेकडो लोकांना पिरीक्षणादरम्यान ही लस देण्यात आल्याचे म्हटले होते.
18 मे रोजीच झाली होती घोषणा -
अमेरिक कंपनी मॉडर्नानेदेखील दावा केला आहे, की ते लवकरच ही लस तयार करतील. तसेच या लसीमुळे कुणालाही कोरोनाची लागन होणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. 18 मे रोजी मॉडर्नाने घोषणा केली होती, की पहिल्या टप्प्यावर हिचा रिझल्ट सकारात्मक आला आहे. mRNA-1273 ही लस अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ आणि मॉडर्ना कंपनीने तयार केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!
झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...