अमेरिका: डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 08:40 AM2018-04-14T08:40:16+5:302018-04-14T08:40:16+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत.

US president donald trump says us france britain strikes on syria now underway | अमेरिका: डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे दिले आदेश

अमेरिका: डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे दिले आदेश

Next

वॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई हल्ल्यांच्या आदेशानंतर सीरियातील दमिश्कजवळ स्फोटाचा आवाजही ऐकू आला. अमेरिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरियाच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर केला जातो आहे. तसंच हल्ल्यासाठी बॉम्बचाही वापर होतो आहे. दुसरीतडे, रशियानेही अमेरिकेला मिसाइल हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.

'सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून हल्ले सुरु करावेत, असे आदेश काहीच वेळापूर्वी आम्ही सैन्याला  दिले आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना म्हणाले. 
'फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो. हा हल्ला असद सरकारला सीरियामध्ये रशियाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापरास रोखण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम आहे, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, सीरियातील डुमामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यात लहान मुलांसह एकूण 74 जणांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: US president donald trump says us france britain strikes on syria now underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.