अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हिरोशिमाला भेट देणार
By admin | Published: May 11, 2016 12:09 AM2016-05-11T00:09:52+5:302016-05-11T00:09:52+5:30
दुस-या महायुद्धात हिरोशिमावर अमेरिकेनं दोनदा अणुबॉम्ब टाकल्यानंतर बराक ओबामा हे हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणार
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 10- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जपानमधल्या हिरोशिमाला या महिन्याच्या शेवटी भेट देणार आहेत. दुस-या महायुद्धात हिरोशिमावर अमेरिकेनं दोनदा अणुबॉम्ब टाकल्यानंतर बराक ओबामा हे हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. मात्र अमेरिकेकडून हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकल्याबाबत ते माफी मागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अणुशक्तीबाबत ओबामांनी वेळोवेळी जनजागृती केल्याबाबत त्यांना 2009ला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 27 मे रोजी जगातला सर्वात पहिला अणुबॉम्ब बनवणा-या ठिकाणी ओबामा जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंसोबत भेट देणार आहेत. ओबामांनी आण्विक शक्तीशिवायही जगाला शांती आणि सुरक्षा मिळू शकते, याचं महत्त्व पटवून दिलं होतं, अशी माहिती व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली. ओबामा 21 ते 28 मेदरम्यान आशियाच्या दौ-यावर असणार आहेत. या दौ-यादरम्यान जपानसह सात देशांचे प्रतिनिधी या समीटमध्ये सहभागी होणार आहेत. दौ-याच्या पहिल्या दिवशी ते व्हिएतनामला भेट देणार आहेत.
71 वर्षांपूर्वी दुस-या महायुद्धात हिरोशिमातल्या मेमोरिअल पार्कजवळ अमेरिकेचे लढाऊ विमान पाडलं होतं. त्या ठिकाणालाही बराक ओबामा भेट देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन रोड्स यांनी दिली आहे. 6 ऑगस्ट 1945ला अमेरिकेकडून हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. या अणुबॉम्बच्या हल्ल्यात जपानमधले हजारो लोक मारले गेले होते. त्या वर्षाअखेरीस जवळपास 1 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेकडून दुसरा अणुबॉम्ब नागासाकी शहरावर टाकण्यात आला होता. सहा दिवसांनंतर जपाननं अमेरिकेसमोर आत्मसमर्पण केलं होतं. अमेरिकेतलं जनजीवन वाचवण्यासाठी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र या स्पष्टीकरणावर जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे असमाधानी आहेत. हिरोशिमातल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यात वाचलेल्या लोकांनी अमेरिकेनं या प्रकारावर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.