US Election Results : डोनाल्ड ट्रम्प की ज्यो बायडन? अमेरिकेत काट्याची टक्कर!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 4, 2020 07:46 AM2020-11-04T07:46:44+5:302020-11-04T09:19:26+5:30

अमेरिकेत 45व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपले आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.

US presidential election 2020 polling result LIVE updates | US Election Results : डोनाल्ड ट्रम्प की ज्यो बायडन? अमेरिकेत काट्याची टक्कर!

US Election Results : डोनाल्ड ट्रम्प की ज्यो बायडन? अमेरिकेत काट्याची टक्कर!

Next


वॉशिग्टन - पुढील चार वर्षांसाठी जगातीलि सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेची सत्ता कुणाच्या हाती द्यायची, याचा निर्णय अमेरिकन जनतेने आपल्या मताच्या आधारे केला आहे. अमेरिकेत 45व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपले आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.

ज्यो बायडन यांनी न्यू मेक्सिको आणि न्यूयॉर्कमध्येही मिळवला विजय - 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी, न्यू मेक्सिको आणि न्यू हॅम्पशायर, न्यूयॉर्क, व्हरमाँट, कोलोरॅडो येथेही विजय मिळवला आहे.

अर्कांससमध्ये ट्रम्प विजयी -
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अर्कांसस राज्यातही विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना येथे 6 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अर्कांसस हे एक शक्तिशाली रिपब्लिकन राज्य आहे. या शिवाय ट्रम्प यांनी दक्षिण डकोटा, उत्तर डकोटा, वेस्ट व्हर्जिनिया, केंटकी आणि इंडियाना येथेही विजय मिळवला आहे.

ट्रम्प 4, तर बायडन 7 राज्यांत विजयी -
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलबामा, मिसिसिपी, ओक्लाहोमा आणि टेनेसी राज्यात विजय मिळवला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मॅरीलँड, मॅसाचुसेट्स, न्यू जर्सी आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना त्या चार राज्यांतून 33 मते मिळाली तर बायडन यांना सात राज्यांतून एकूण 69 मते मिळाली आहेत.

ट्रम्प-बायडन अटीतटीची लढत -
जो बिडेन -

इलेक्टोरल मते - 85
मतांचा टक्का - 48.8%
मतगणना - 1,01,06,412

डोनाल्ड ट्रम्प -
इलेक्टोरल मते - 55
मतांचा टक्का - 50.1%
मतगणना - 1,03,85,332

डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनामध्येही मिळवला विजय -
एपी या वृत्त संस्थेनने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिना राज्यातही विजय मिळवला आहे. येथे त्यांना 9 मते मिळाली आहेत.
 

Web Title: US presidential election 2020 polling result LIVE updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.