"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 01:51 PM2024-09-29T13:51:31+5:302024-09-29T13:52:09+5:30
आपण 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जिंकलो तर नवीन टॅब ओपण केल्यासंदर्भात Google विरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत लवकरच राष्ट्रपतीपदाची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प देखील मैदानात आहेत. ट्रम्प हे सातत्याने चर्चेत राहणारे नेते आहेत. आता, आपण 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जिंकलो तर नवीन टॅब ओपण केल्यासंदर्भात Google विरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांचा दावा आहे की, कंपनी केवळ त्यांच्या बद्दलच "वाईट गोष्टी" प्रदर्शित करते. मात्र, त्यांनी ट्रुथ सोशलवरील गुगल संदर्भातील त्यांच्या दाव्यासंदर्भात कसलाही पुरावा दिलेला नाही.
काय म्हणाले ट्म्प? -
ट्रम्प म्हणाले, "गुगलने अवैध पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पसंदर्भात केवळ वाईट गोष्टीच प्रदर्शित करण्यासंदर्भात एका सिस्टिमचा वापर केला आहे. याच वेळी, डेमोक्रॅटिक फक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या संदर्भात चांगल्या गोष्टी करत आहेत."
ट्रम्प म्हणाले, "ही एक बेकायदेशीर कृती आहे आणि न्याय विभागाने या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला चालवणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास, मी निवडणूक जिंकल्यानंतर आणि अमेरिकेचा राष्ट्रपती झाल्यानंतर, आपल्या देशाच्या कायद्यांतर्गत कमाल पातळीवर त्याच्याविरोधात खटला चालवण्याची विनंती करेन."
टम्प यांनी 2029 मध्येही केले होते आरोप -
वॉशिंग्टन पोस्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्येही गूगलसंदर्भात असाच दावा केला होता. त्यांनी ट्विटरवर (आताचे एक्स) पोस्ट करत, गूगलने 2016 च्या राष्ट्रपती निवडणुकीत आपल्यासंदर्भात निगेटिव्ह न्यूजला सपोर्ट केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी गूगलने त्यांचा आरोप फोटाळून लावला होता.