कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 09:27 AM2024-07-29T09:27:12+5:302024-07-29T09:30:31+5:30

US Presidential Election 2024 : अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूका सुरू आहेत. दरम्यान, या आठवड्यात कमला हॅरिस यांच्या कॅम्पेन टीमने २०० मिलियन डॉलरचा फंड जमा केला आहे.

US Presidential Election 2024 Kamala Harris Raises $200 Million in One Week for Democratic Party | कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा

कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा

US Presidential Election 2024 ( Marathi News ) : अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक आता चांगलीच चर्चेत आली आहे, जो बायडेन या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. दरम्यान, आता त्यांनी कमला हॅरिस यांना समर्थन दिले. एका आठवड्यानंतर, कमला हॅरिस यांनी अधिकृतपणे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारीची घोषणा केली, त्यांच्या कॅम्पेन टीमने एका आठवड्यात २०० मिलियन डॉलर जमा केले आहेत. 

कमला हॅरिस यांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्या निवडणूक प्रचाराला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांना एका आठवड्यात २०० मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला आहे. हा सर्व पैसा त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान जमा केला आहे.

India Schedule at Paris Olympics 2024: आज भारताच्या खात्यात किती पदके? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय सामन्यांचे वेळापत्रक

एका अहवालानुसार, कमला हॅरिस यांनी रविवारी २८ जुलै रोजी त्यांच्या फंडची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, हॅरिसच्या प्रचार टीमला २०२४ च्या निवडणुकीत प्रथमच देणगी देणाऱ्या लोकांकडून ६६ टक्क्यांहून अधिक निधी मिळाला आहे. कमला हॅरिस यांच्या मोहिमेला मदत करण्यासाठी १,७०,००० हून अधिक स्वयंसेवकांनी साइन अप केले आहे. हे लोक फोन कॉल्स, जनसंपर्क आणि मतदानाशी संबंधित कामात मदत करतील.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही मोठा निधी

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेन टीमने जुलैच्या सुरुवातीला सांगितले की, त्यांनी दुसऱ्या तिमाहीत US ३३१  मिलियन डॉलर जमा केले, जे डेमोक्रॅटिक सहयोगींनी उभारलेल्या US २६४ मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहेत. ट्रम्प यांच्या कॅम्पेनकडे जून अखेरीस US २८४.९ मिलियन डॉलर रोख होते, तर डेमोक्रॅटिक कॅम्पेनकडे त्यावेळी US २४० मिलियन डॉलर रोख होते.

दरम्यान, निवडणुकीला अजून १०० दिवस बाकी आहेत. मागील आठवड्यातील सर्वे७णात हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून दोन्हीकडून प्रचाराला सुरूवात केली आहे.

ट्रंप आणि व्हॅन्स यांच्याकडून येणारी अधिकांश विधाने विचित्र - 

मॅसॅच्युसेट्समध्ये बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी सिनेटर जेडी व्हॅन्स यांच्याकडून येणारी बहुतेक विधानं विचित्र आहेत. याचबरोबर, कमला हॅरिस त्यांच्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांना म्हातारे आणि विचित्र म्हणूनही संबोधत आहेत. हॅरिस ट्रम्प यांना वारंवार 'विचित्र' म्हणत आहेत कारण हा शब्द तिच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणाचा भाग आहे.

कमला हॅरिस अमेरिकेला बर्बाद करतील - 

कमला हॅरिस यांना प्रत्युत्तर देतान ट्रम्प म्हणाले, हॅरिस देशाला बर्बाद करतील. सार्वजनिक सुरक्षेपासून ते इमिग्रेशनपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवरून ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर टीका केली. कमला हॅरिससारख्या वेड्या उदारमतवादी सत्तेवर आल्यास अमेरिकेच्या स्वप्नांनाच चुराडा होईल. तसेच त्या बायडेन यांचेपेक्षाही वाईट असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

Web Title: US Presidential Election 2024 Kamala Harris Raises $200 Million in One Week for Democratic Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.