ट्रम्प यांच्या सर्वात छोट्या मुलाला विचारलं गेलं, कुणाला केलं मतदान? मिळालं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:56 PM2024-11-11T14:56:39+5:302024-11-11T14:57:39+5:30
बॅरनच्या उत्तराचे अनेक रिपब्लिकन नेत्यांनी कौतुक केले आहे. बॅरनने त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2044 मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा, असे म्हटले आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीची चर्चा अजूनही सुरूच आहे. यातच, माध्यमांतील वृत्तांनुसार, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये (NYU) बॅरन ट्रम्प याला त्याच्या मित्रांनी राजकीय विचारासंदर्भात प्रश्न केला होता, याला त्याने अगदी पॉलिटिकल उत्तर दिले आहे. स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसच्या सूत्रांच्या हवाल्याने Irish Star ने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प पुत्र बॅरनने आपण कुठल्याही पक्षाचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे.
बॅरनने 2044 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा -
बॅरनच्या उत्तराचे अनेक रिपब्लिकन नेत्यांनी कौतुक केले आहे. बॅरनने त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2044 मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा, असे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या प्रचाराशी संबंधित वरिष्ठ सल्लागार काय म्हणाले?
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी संबंधित वरिष्ठ सल्लागार जेसन मिलर Politico Playbook Deep Dive पॉडकास्टवर बोलताना म्हणाले, "बॅरन ट्रम्पने आम्हाला अनेक पॉडकास्ट्सचा सल्ला दिला होता. मी या तरुणाला सॅल्यूट करतो. त्याने दिलेल्या प्रत्येक सल्ल्याने आम्हाला इंटरनेटवर हिट केले."
बॅरन ट्रम्पने निवडणुकीत कुणाला केलं मतदान? -
खरे तर, बॅरनने आपली राजकीय भूमिका तटस्थ असल्याचे म्हटले आहे. मात्र, निवडणुकीच्याच दिवशी मिलेनिया ट्रम्प यांनी एक फोटो पोस्ट शेअर केला होता. यात बॅरन त्याच्या वडिलांना मतदान करताना दिसला होता. सोबतच त्यांनी लिहिले होते, "आपल्या पहिल्या मतदानात वडिलांना मतदान केले." मात्र यात मतदान कुठे केले, याचा खुलासा करण्यात आला नाही. मात्र, ते ट्रम्प यांचे गृह राज्य असलेल्या फ्लोरिडामध्ये केलेले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.