राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:04 AM2020-09-04T05:04:59+5:302020-09-04T05:05:28+5:30
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेत हिंदूंची संख्या मोठी असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जोरदार प्रयत्न करीत आहेत.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत.
एका माहितीनुसार, अमेरिकेत सुमारे २० लाख हिंदू मतदार आहेत. बायडन यांनी ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ अशी मोहीम सुरू केली आहे. बायडन यांनी हिंदू समुदायावर होणारे अन्याय आणि भेदभावाच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प यांनी ‘हिंदू व्हाइसेस फॉर ट्रम्प’ नावाची मोहीम सुरू केली आहे.
बायडेन यांच्या मोहिमेचे सहप्रमुख बालाजी मुरली यांनी सांगितले की, अमेरिकेतील हिंदूंकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार
नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इंडियन व्हॉइसेस फॉर ट्रम्प’, ‘हिंदू व्हॉइसेस फॉर ट्रम्प’, ‘सिख्स फॉर ट्रम्प’ आणि ‘मुस्लिम व्हॉइसेस फॉर ट्रम्प’ या संघटनाही तयार केल्या आहेत.