डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:38 PM2024-11-06T17:38:35+5:302024-11-06T17:39:05+5:30
ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर, त्यांच्या या लाल टोपीवर जे लिहिले होते ते खरे ठरल्याचे बोलले जात आहे. तर जाणून घेऊयात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टोपीवर असे काय लिहिले होते? जे खरे ठरले...
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून आता ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. यातच, त्यांच्या लाल टोपीचीही जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर, त्यांच्या या लाल टोपीवर जे लिहिले होते ते खरे ठरल्याचे बोलले जात आहे. तर जाणून घेऊयात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टोपीवर असे काय लिहिले होते? जे खरे ठरले...
काय लिहिलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या टोपीवर? -
खरे तर, डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या निवडणूक सभा आणि रॅलींमध्ये नेहमीच लाल टोपी घातलेले दिसून आले. या टोपीच्या उजव्या बाजूला लिहिले होता '45-47'. ट्रम्प यांच्याशिवाय त्यांचे समर्थकही 45-47 लिहिलेल्या टोप्या घालत होते. महत्वाचे म्हणजे, निवडणूक रॅलीदरम्यान जेव्हा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, तेव्हाही त्यांनी हीच टोपी घातली होती.
काय आहे '45-47' चा अर्थ -
जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी राष्ट्राध्यक्ष बनले होते, तेव्हा ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते. यावेळी ते 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. यामुळेच त्यांच्या लाल टोपीवर 45-47 असे लिहिले होते. यातील 45 हा अंग ट्रम्प यांच्या जुन्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. तर 47 हा अंक नव्या कार्यकाळाशी संबंधित आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आणि अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.