"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:25 PM2024-11-05T19:25:30+5:302024-11-05T19:29:20+5:30
इवांका ट्रम्प न्यूज नावाच्या हँडलवरून अमेरिकन जनतेला निवडणुकीसंदर्भात एक खास अपील करण्यात आली आहे...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पनेही एन्ट्री केली आहे? आपल्या वडिलांच्या निवडणूक प्रचारापासून आतापर्यंत दूर राहिलेल्या इवांका ट्रम्पच्या नावाने, मतदानाच्या अगदी काही वेळ आगोदरच करण्यात आलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कारण, इवांका ट्रम्प न्यूज नावाच्या हँडलवरून अमेरिकन जनतेला निवडणुकीसंदर्भात एक खास अपील करण्यात आली आहे.
प्रचारापासून दूर असलेल्या इवांका अचानक चर्चेत -
दीर्घकाळ मौन आणि निवडणूक प्रचारापासून दूर राहिलेल्या इवांका ट्रम्प यांची अचानक व्हायरल झालेल्या पोस्टची जगभरात चर्चा होत आहे. कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, म्हणजेच अगदी काही तास आधी इवांका ट्रम्प यांच्या नावाने समोर आलेली पोस्ट मथळ्याचा भाग बनली आहे. या पोस्टमध्ये एका प्री-पोल सर्व्हेच्या पोस्टरसह, "2024 च्या निवडणुकीत ट्रम्प विजयी होतील, असा विश्वास आपल्याला असेल, तर येथे हार्ट द्या"
Drop a HEART ❤️, If you believe Trump will emerge the winner of 2024 election... pic.twitter.com/KsKpVi6QM8
— Ivanka Trump 🇺🇲 🦅 News (@IvankaNews_) November 5, 2024
इवांका ट्रम्पचे दुसरे हँडल आणि पोस्ट बघून लोकांच्या मनात शंका -
इवांका ट्रम्प यांचे एक्सवरील दुसरे हँडल आणि पोस्टमधील कंटेट पाहून अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. यानंतर इवांका ट्रम्प न्यूज नावाचे ब्ल्यू टिक असलेले व्हेरिफाइड एक्स हँडल डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग असू शकतो, असे बोलले जात आहे. कारण यावर जवळपास सर्वच पोस्ट अमेरिकन निवडणूक आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी संबंधित आहे. इवांका ट्रम्प यांच्या आधीच्या व्हेरिफाइड अकाउंटवर त्यांच्या 43 वर्षांच्या होण्यासंदर्भातील एक वैयक्तिक पोस्ट देखील दिसत आहे.
This past week, I turned 43!
— Ivanka Trump (@IvankaTrump) November 4, 2024
Reflecting on life’s lessons, here are some truths I’ve learned along the way: pic.twitter.com/vP1zFJ7onX