अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत

By admin | Published: November 9, 2016 08:08 AM2016-11-09T08:08:05+5:302016-11-09T08:08:05+5:30

अमेरिका जगातला एक महत्त्वाचा देश असल्याने त्या देशाचं नेतृत्व हातात आल्यानंतर तिथे होणा-या धोरणात्मक बदलांचा भारतावरही परिणाम होऊ शकतो

US Presidential Elections and India | अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर जगाचं लक्ष आहे. जागतिक महासत्ता म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण बसणार हे काही वेळातच कळेल. या निवडणुकीकडे भारताचंही बारकाईने लक्ष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष कोणीही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही असं म्हणून चालणार नाही, कारण या निवडणुकीचा भारतावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. अमेरिका जगातला एक महत्त्वाचा देश असल्याने त्या देशाचं नेतृत्व हातात आल्यानंतर तिथे होणा-या धोरणात्मक बदलांचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. 
 
(कशी होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड ?)
(US ELECTION - हिलरी की ट्रम्प?)
(US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान)
 
भारताच्या दृष्टीने अमेरिका एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणांचा भारतीय कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. भारत अमेरिकेकडून जवळपास 214,519 लाख अमेरिकन डॉलर्सचा माल आयात करतो. भारताला 233,400 लाख अमेरिकन डॉलर्सचा फायदा होतो. भारतीय कंपन्यांना या दोहोंमधील कोणीही निवडून आले, तरी नव्याने तयार केल्या जाणाऱ्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीमुळे आव्हान तयार होऊ शकते. 
 
भारतासाठी दहशतवाद महत्वाचा विषय असून पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारा पाठिंबा आणि आर्थिक मदत भारतासाठी नेहमी चिंतेचा विषय ठरला आहे. तसंच चीनकडून असलेला धोका यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे. हिलरी किंवा ट्रम्प यांच्यापैकी कोण राष्ट्राध्यक्ष होतं यावर भारताची ही लढाई अवलंबून असणार आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे मुस्लिमविरोधी वक्तव्य करत दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर हिलरी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी समर्थता दर्शवलेली आहे. 
 

Web Title: US Presidential Elections and India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.