H-1B व्हीसा प्रकरणी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा धक्का
By admin | Published: March 5, 2017 10:29 AM2017-03-05T10:29:12+5:302017-03-05T13:11:00+5:30
एच-1बी व्हीसा प्रकरणी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अमेरिकेने धक्का दिला आहे. भारताकडून या व्हीसासाठी सुरू
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 5 - एच-1बी व्हीसा प्रकरणी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अमेरिकेने धक्का दिला आहे. भारताकडून या व्हीसासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करत अमेरिकेने एच-1बी व्हीसाच्या प्रीमियर प्रोसेसिंगला सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे.
एच-1बी व्हीसाबाबत भारताकडून जोरदार पाठपुरावा करण्यात येत होता. त्यासाठी नेस्कॉमचे काही सदस्य आणि भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली काही अधिकाऱ्यांनी अमेरिकेत जाऊन आपली बाजू मांडली होती. त्यावेळी अमेरिकेने एच-1बी व्हीसा ही आपली प्राथमिकता नसून, तो त्यांच्या स्थलांतराबाबतच्या नीतीचा भाग असल्याचे अमेरिकेने सांगितले होते. या आश्वासनानंतरही अमेरिकेने एच-1बी व्हीसाच्या प्रीमियम प्रोसेसिंगला स्थगिती दिली आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी संसद सदस्यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत एच-1बी व्हीसाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. तसेच भारताच्या प्रतिनिधींनी ट्रम्प प्रशासनाशी चर्चा करून या मुद्यावर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याचे आवाहन केले होते. मात्र भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि वित्त सचिव रीता तेवरिया यांनी अमेरिकी प्रशासनाशी चर्चा करून काही तास उलटण्यापूर्वीच ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.