अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:53 PM2020-08-29T14:53:05+5:302020-08-29T15:15:22+5:30

याआधी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याची परवानगी दिली होती.

us regulators allow remdesivir for hospitalised due to corona virus | अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी

अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी

Next
ठळक मुद्देजगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 वर पोहोचली आहे.

अमेरिकेने आपल्या देशातील कोरोना रूग्णांवर उपचारांसाठी अँटीव्हायरल औषध रेमेडिसविरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. आता हे औषध रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणार आहे. औषध निर्माता कंपनी गिलियड सायन्सेसने म्हटले आहे की, कोविड-१९ च्या नियामकाने सर्व रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांसाठी प्रायोगिक अँटीव्हायरल औषध रेमेडिसविरच्या वापरास परवानगी दिली आहे.

याआधी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याची परवानगी दिली होती. आतापर्यंत हे केवळ तीव्र कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येत होते.  कॅलिफोर्नियाच्या गिलियड कंपनीने १० ऑगस्टला या रेमेडिसवीरच्या औपचारिक मान्यतासाठी अर्ज केला होता. आता हे वेक्लरी या ब्रँड नावाने विकले जाईल.

गिलियडने निवेदनात म्हटले आहे की, आपत्कालीन उपयोगाच्या सुविधेचा विस्तार आहे. हे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या नुकत्याच झालेल्या फेडरल चाचणीच्या निकालांवर आधारित होते. यामध्ये गांभीर्याचे वेगवेगळे स्तर पाहता हा निर्णय घेण्यात आला.
गिलियडच्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूमुळे रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये रेमेडिसविरचा उपयोग केल्यानंतर पाच दिवसांच्या उपचारात बरे होणाऱ्यांची शक्यता 65% अधिक होती.

जगभरात आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 जणांना कोरोनाची लागण
जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 वर पोहोचली आहे. Worldometers ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटींच्या पार गेली असून आतापर्यंत एकूण 8,41,331 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर 1,72,99,915 रुग्ण बरे झाले असून त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. जगभराचा विचार केला असता कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून देशात 60,96,235 रुग्ण आढळले आहेत. Worldometers दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 1 लाख 85 हजार 901 रुग्ण दगावले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 33,75,838 वर पोहोचली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझील आणि भारत देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ३४ लाखांवर
जगभरात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. तसेच, भारतातही कोरोना संक्रमितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत 62,550 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादाक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 26,48,999 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.

आणखी बातम्या...

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

Web Title: us regulators allow remdesivir for hospitalised due to corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.