अमेरिका घालणार पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 08:43 PM2019-04-27T20:43:33+5:302019-04-27T20:46:45+5:30

आता अमेरिका पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध घालण्याच्या विचारात आहे.

US restrictions on Pakistani citizens' visa | अमेरिका घालणार पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध 

अमेरिका घालणार पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध 

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेतील कायद्यांतर्गत ज्या १० देशांवर प्रतिबंध घालता येणार आहे याअगोदर २००१ साली गयाना, कंबोडिया, इरिट्रीया, गिनी आणि २०१७ साली बर्मा आणि लाओस या देशांचाही समावेश करण्यात आला होता.

वॉशिंग्टन - पुलवामा हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात देखील दरी निर्माण झाली आहे. त्यातच आता अमेरिका पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध घालण्याच्या विचारात आहे.

अमेरिकेतील कायद्यांतर्गत ज्या १० देशांवर प्रतिबंध घालता येणार आहे. यात पाकिस्तानचे देखील नाव आहे. या कायद्यानुसार निर्बंध असलेल्या राष्ट्रातील नागरिकांनी व्हिसातील मुदतीपेक्षा जास्त काळ अमेरिकेत वास्तव्य केल्यास आणि व्हिसा परत देण्यास नकार दिल्यास त्याचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी याच वर्षी पाकिस्तान आणि घाना यांचा या यादीत समावेश केला आहे. याअगोदर २००१ साली गयाना, कंबोडिया, इरिट्रीया, गिनी आणि २०१७ साली बर्मा आणि लाओस या देशांचाही समावेश करण्यात आला होता.

अमेरिकेने २०२८ साली ३८ हजार पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अमेरिकेने व्हिसा कार्डचा खेळ करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या या खेळीपुढे झुकत पाकिस्तानने अनेक दहशतवादी संघटनांवर निर्बंध घातले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी सैन्य मदतही थांबवली आहे.

Web Title: US restrictions on Pakistani citizens' visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.