CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 08:00 PM2020-05-03T20:00:51+5:302020-05-03T20:05:04+5:30
कोरोना व्हायरसची निर्मिती ही कोणत्याही प्राण्यापासून झालेली नसून ती वुहानच्याच लॅबमधून झाल्याचे पुरेसे पुरावे सापडले असल्याचा दावा पॉम्पिओ यांनी केला आहे.
वॉशिंग्टन : चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आणि त्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला आहे. यामुळे जगभरात दोन लाखांवर मृत्यू झाले असून अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे. या व्हायरसचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला असून यामुळे ट्रम्प प्रशासन चीनला दोषी ठरवत आहे. चीनची चौकशी करण्याचा प्रयत्नही अमेरिकेकडून केला जात आहे. यातच आज अमेरिकेचे सचिव माईक पॉम्पिओ यांनी मोठा दावा केला आहे.
कोरोना व्हायरसची निर्मिती ही कोणत्याही प्राण्यापासून झालेली नसून ती वुहानच्याच लॅबमधून झाल्याचे पुरेसे पुरावे सापडले असल्याचा दावा पॉम्पिओ यांनी केला आहे. अमेरिकेच्या पथकाने चीनमध्ये तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याला चीनने मान्यता दिली नव्हती. अखेर अमेरिकेने आणि अन्य देशांनी गुप्तहेरांकडून चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर चीनची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. तसेच ही संघटना चीनला पाठीशी घालत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. यांनंतर कोरोनाला चीनी व्हायरस म्हणून ट्रम्प यांनी चीनला दुखविले होते. यावरून वाद झाला होता. ट्रम्प यांनी चीनला याची जबर किंमत मोजावी लागेल अशी धमकीच दिली होती.
आज पॉम्पिओ यांनी हा दावा करताना म्हटले की, कोरोना व्हायरसचा उगम कुठून झाला याचे पुरेसे पुरावे सापडले आहेत. आम्हाला अद्याप वुहान इन्सि्टट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या तपासणीची परवानगी देण्यात आलेली नाही. चीनमध्ये अशा अनेक लॅब आहेत, जिथे कोरोनासारखे व्हायरस तयार केलेले आहेत. त्यांच्याकडे या व्हायरसना पसरू न देण्यासाठी कोणती यंत्रणा आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता
कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट
आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप
CoronaVirus धक्कादायक! रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; आरोग्य कर्मचारी भावाच्या बाईकवर बसून पसार झाला
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
लॉकडाऊन वाढला! तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले