अमेरिकी सिनेटनं भारताला स्पेशल दर्जा देण्याचं विधेयक नाकारलं
By admin | Published: June 15, 2016 06:32 PM2016-06-15T18:32:12+5:302016-06-15T19:30:29+5:30
अमेरिकी सिनेटनं भारताला जागतिक सामरिक आणि संरक्षण भागीदार करून घेण्यास नकार दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 15 - अमेरिकी सिनेटनं भारताला जागतिक सामरिक आणि संरक्षण भागीदार करून घेण्यास नकार दिला आहे. भारतानं निर्यात नियंत्रण नियमांत सुधारणा करण्याचा सल्ला अमेरिकन सिनेटनं भारताला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच अमेरिकी काँग्रेससोबत संयुक्त अधिवेशन घेतलं होतं.
अमेरिकेनं भारताला विशेष दर्जा नाकारला असून, रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर जॉन मॅककेन यांनी भारताला राष्ट्रीय संरक्षण अधिकार कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. या कायद्यातील दुरुस्तीनंतर भारताला सामरिक आणि संरक्षण भागीदार करून घेता येईल, असं जॉन मॅककेन यांनी सांगितलं आहे. हे विधेयक मंजूर झाले असते तर भारतास अमेरिकेचा व्यूहात्मक व संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार देश असा दर्जा मिळाला असता. यामुळे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणविषयक तंत्रज्ञान आणि व्यापारासाठी भारत पात्र ठरला असता.
याआधी बराक ओबामा आणि नरेंद्र मोदींनी संयुक्तरीत्या भारताला मोठा संरक्षण भागीदार करून घेणार असल्याची घोषणा केली होती. भारताला भागीदार न करता आल्याबाबत जॉन मॅककेन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.