हॅकर्सचा मोठा अटॅक! अमेरिकेत तब्बल दीड लाख कॅमेरे केले हॅक; कंपनी, रुग्णालयाचा उडवला डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:03 PM2021-03-11T12:03:06+5:302021-03-11T12:05:16+5:30
US Thousands of Security Cameras Hacked : हॅकर्सच्या एका ग्रुपने सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या स्टार्टअप वेरकाडाच्या सुरक्षा कॅमेऱ्याचा डेटा हॅक केला असल्याची घटना आता समोर आली आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेत हॅकर्सने मोठा अटॅक केला आहे. हॅकर्सच्या एका ग्रुपने सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या स्टार्टअप वेरकाडाच्या सुरक्षा कॅमेऱ्याचा डेटा हॅक केला असल्याची घटना आता समोर आली आहे. या हॅकिंगमुळे रुग्णालये, कंपन्या, पोलीस विभाग, तुरुंग आमि शाळांमध्ये लावण्यात आलेले दीड लाखांहून अधिक सिक्युरीटी कॅमेऱ्याची लाइव्ह फिड हॅकर्सने मिळवली. टेस्ला, क्लाउड फ्लेयर आदी कंपन्यांच्या डेटा हॅक करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिकेत हॅकिंगमुळे खळबळ उडाली आहे. हॅकर्सने महिला रुग्णातील आतील दृष्येही हॅक केली आहेत. यातील अनेक कॅमेरे हे चेहऱ्यावरून व्यक्तीची ओळख पटवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांचाही डेटा हॅकर्सच्या हाती लागला आहे. वेरकाडा कंपनीच्या सगळ्या ग्राहकांचे व्हिडिओ अर्काइव्हदेखील हाती लागले असल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. टेस्लाच्या व्हिडिओत शांघाईतील एक कर्मचारी असेंब्ली लाइनवर काम करत असल्याचे दिसत होते.
राहा सतर्क! गुगलवर नेमकं काय सर्च करताय?, सावध व्हा अन्यथा...https://t.co/hJZ5FsovP6#Google#search#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2021
टेस्लाचे कारखाने आणि गोदामात असणाऱ्या 222 कॅमेऱ्याचा डेटा मिळाला असल्याचं हॅकर्सने सांगितले. या हॅकिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॅकर्स सहभागी होते, असा दावा एका हॅकर्सने केला आहे. सीसीटीव्हीच्या द्वारे कितीही पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी या यंत्रणा हॅक करणे शक्य असल्याचे दाखवून देण्यासाठीच ही हॅकिंग करण्यात आली असल्याचे हॅकर्सने म्हटलं आहे. ही सिस्टम तोडणं सोपं असल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Whatsapp वर मेसेज टाईप करण्याचा कंटाळा येतो? मग 'या' ट्रिक्स ठरतील फायदेशीरhttps://t.co/zZaRdnqg5q#WhatsApp#technologynews
— Lokmat (@MiLOKMAT) March 5, 2021
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच फसवणूकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. देशातील बँकिंग फसवणूकीच्या (Banking Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच एक मोठं कारण म्हणजे यादरम्यान इंटरनेटचा वाढता वापर. याचाच फायदा सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी करुन घेत आहेत. गृहमंत्रालयानेच आता याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे.
मंत्रालयाने लोकांना इशारा दिला आहे, की कोणत्याही प्रकारची चूक करू नका. तसेच तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची प्रकरणं समोर येत आहेत. याच कारणामुळे सरकार आणि बँकांनी लोकांना याबद्दल जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तरीही हे गुन्हे बंद झालेले नाहीत. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करत आहे. नवनवीन मार्गांनी लोकांना आपल्या जाण्यात ओढत आहेत. लिंकवर क्लिक केल्यास हॅकर तुमची संपूर्ण माहिती चोरू शकतात. त्यामुळे अशा लिंकवर कधीच क्लिक करू नका.
भारीच! WhatsApp वर आता हवा तो व्हिडीओ म्यूट करता होणार, स्टेटसलाही ठेवता येणारhttps://t.co/cVMaPQx2nx#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2021