US Tornado: अमेरिकेच्या इतिहासातील भीषण संकट, १०० पेक्षा जास्त मृत्यू; १ हजार घरं जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 10:42 AM2021-12-13T10:42:57+5:302021-12-13T10:49:19+5:30

वेगवान वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ३०० जवान घराघरात जात ढिगारा बाजूला हटवण्यासाठी लोकांची मदत करत आहेत.

US Tornado: up to 100 people feared dead after historic storms, At least 1000 homes destroyed | US Tornado: अमेरिकेच्या इतिहासातील भीषण संकट, १०० पेक्षा जास्त मृत्यू; १ हजार घरं जमीनदोस्त

US Tornado: अमेरिकेच्या इतिहासातील भीषण संकट, १०० पेक्षा जास्त मृत्यू; १ हजार घरं जमीनदोस्त

Next

केंटुकी – अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळानं भीषण रौद्ररुप धारण केले आहे. केंटुकी येथील मेणबत्ती कारखान्यात ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अन्य ८ बेपत्ता आहेत. या वादळाचा फटका अनेकांना बसला आहे. इलिनोइस येथे कमीत कमी ६ लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. एडवर्ड्सविलेमध्ये १, टेनेसी, ४, अर्कांसस येथे २, मिसोरी इथं २ लोकांचा मृत्यू झाला आहे. बॉलिंग ग्रीन आणि आसपासच्या परिसरात ११ लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. आकडेवारी पाहिली तर अमेरिकेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे.

आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू, हे सांगू शकत नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं संकट असल्याचं सांगितले आहे. या वादळात किती जणांचा मृत्यू झाला हे सांगू शकत नाही. केंटुकी परिसरात शनिवारी अचानक अंधार पडला. या भीषण चक्रीवादळानं अनेकांचा जीव घेतला. वादळामुळे इमारती कोसळल्या. यातील ढिगाऱ्याखाली अनेक लोकं गाडली गेली. बचाव पथकाकडून लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

केंटुकीचे राज्यपाल एंडी बेशियर यांनी रविवारी इशारा दिला की, या चक्रीवादळात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या वादळाचा सर्वात जास्त फटका केंटुकी याठिकाणी बसला. मेणबत्ती कारखान्यातून ४० लोकांचा वाचवण्यात आले. वादळ इतकं भीषण होतं की त्यामुळे बचाव पथकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. केटुंकी येथील पादरी जोएल कॉली यांनी या संकटाची दृश्य पाहिली ते म्हणाले की, हे खूप भीषण आहे. मेणबत्ती कारखान्याच्या चहुबाजूने लोकांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकायला मिळत होता. सायरनचा आवाज ऐकायला येत होता. आतापर्यंत याची कधीही कल्पनाही केली नाही.

१ हजारापेक्षा जास्त घरं उद्ध्वस्त

या भीषण संकटामुळे सर्वजण दु:खात आहेत. एकाचवेळी खोदकाम आणि स्वच्छता सुरु आहे. राज्यात ४ वेळा चक्रीवादळ आले. ज्यातील एक ३२२ किमी लांब होते. राज्यपाल बेशियर यांनी डॉसन स्प्रिंग्सबद्दल सांगितले की, माझ्या वडिलांच्या होमटाऊनचा निम्मा हिस्सा नष्ट झाला. त्याठिकाणी १ हजारांपेक्षा जास्त घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अमेरिकेत केटुकीचं तापमान ४ डिग्री आहे. वेगवान वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ३०० जवान घराघरात जात ढिगारा बाजूला हटवण्यासाठी लोकांची मदत करत आहेत. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी श्वानांची मदत घेतली जात आहे. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी पोहचलेल्या किर्क नावाच्या महिलेने सांगितले की, ती तिच्या बॉयफ्रेंडपासून अवघ्या १० फूट अंतरावर होती. तेव्हा अचानक आलेल्या वादळानं आकाशात वीज चमकली. माझी १ सेंकदासाठी नजर हटली आणि तो गायब झाला. तो कुठे आहे याचा पत्ता मला लागत नाही असं महिलेने सांगितले.

Web Title: US Tornado: up to 100 people feared dead after historic storms, At least 1000 homes destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.