US Visa: अतिरिक्त शुल्क भरून अमेरिकेच्या व्हिसासाठी आधी अपॉईंटमेंट मिळू शकते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 03:42 PM2022-02-13T15:42:47+5:302022-02-13T15:48:46+5:30
सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत अपॉईंमेंटचे स्लॉट्स हळूहळू उघडत आहेत. व्हिसा अपॉईंटमेंटसाठी असलेल्या मागण्यांच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन दिल्या अपॉईंटमेंट्स कमी आहेत याची आम्हाला जाणीव आहे.
प्रश्न: अतिरिक्त शुल्क भरून मला व्हिसासाठी आधी अपॉईंटमेंट मिळू शकते का?
उत्तर: शुल्क भरून व्हिसासाठी अपॉईंटमेंट देण्याचं वचन किंवा विनंती हा घोटाळा आहे. अमेरिकेच्या दुतावासाशी त्याचा कोणताही संबंध नाही.
सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत अपॉईंमेंटचे स्लॉट्स हळूहळू उघडत आहेत. व्हिसा अपॉईंटमेंटसाठी असलेल्या मागण्यांच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन दिल्या अपॉईंटमेंट्स कमी आहेत याची आम्हाला जाणीव आहे. लवकर अपॉईंटमेंट निश्चित करण्याचं वचन देऊन फसवणूक करणारे सक्रीय असल्याची आम्हाला कल्पना आहे. हे लोक व्हिसा अपॉईंटमेंटसाठी साधारणत: ७ हजार १२५ ते ३० हजार रुपयांपर्यंतचं (९५ ते ४०० अमेरिकन डॉलर) किंवा त्याहून अधिक शुल्क घेतात. हे लोक लोकांना त्यांचं यूजर नेम आणि/किंवा त्यांचा पासवर्डही देण्यास सांगतात.
हे अपॉईंटमेंट फिक्सर्स सोशल मीडिया आणि व्हॉट्सऍप, फेसबुक आणि टेलिग्राम यांच्यासारख्या ऍप्लिकेशन्सचा वापर करून लोकांशी संपर्क साधतात. शुल्क भरल्यास व्हिसा अपॉईंटमेंटची खात्री ते देतात आणि चौकशीसाठी थेट मेसेज करण्यास सांगतात.
एखाद्या अज्ञात व्यक्तीनं अशी ऑफर दिल्यास, शुल्क आगाऊ भरण्यास सांगितल्यास किंवा लवकर अपॉईंटमेंट देण्याचं वचन दिल्यास सावध राहा. तुमचा युजरनेम, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर करू नका. अमेरिकेच्या दुतावासातील किंवा वकिलातीमधील कोणताही अधिकारी कोणत्याही परिस्थितीत व्हिसाची खात्री देऊ शकत नाही किंवा अपॉईंटमेंटसाठी अतिरिक्त शुल्क आकारत नाही. तुमच्यासोबत असा काही गैरव्यवहार झाला असल्यास किंवा अतिरिक्त शुल्कासाठी कोणी तुमच्याशी संपर्क साधला असल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा आणि एफआरची प्रत आम्हाला fraud@ustraveldocs.com वर पाठवा.
अपॉईंटमेंट निश्चित करण्यात तुम्हाला काही अडचणी येत असल्यास support-india@ustraveldocs.com वर आमच्याशी संपर्क साधा किंवा (91-120) 484-4644, (91-40) 4625-8222, 1-703-520-2239 (अमेरिकेतून कॉल करण्यासाठी) या क्रमांकावर कामाच्या तासांमध्ये कॉल करा.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.