US Visa: डीएस-१६०/२६० अर्ज म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा असतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 03:54 PM2022-05-07T15:54:50+5:302022-05-07T15:59:18+5:30
डीएस-१६० आणि डीएस-२६० अर्जांमधील माहितीमुळे दुतावासातील अधिकाऱ्यांना अर्जदाराला अमेरिकेला कोणत्या कारणासाठी जायचं आहे ते समजूत घेता येतं.
प्रश्न- डीएस-१६०/२६० अर्ज म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा असतो?
उत्तर- अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करण्याची पहिली पायरी म्हणजे ऑनलाईन अर्ज. नॉन इमिग्रंट व्हिसासाठी डीएस-१६० आणि इमिग्रंट व्हिसासाठी डीएस-२६० अर्ज करावा लागतो. या अर्जाच्या माध्यमातून अर्जदाराची वैयक्तिक आणि कुटुंबाची पार्श्वभूमी, आधी केलेले आंतरराष्ट्रीय प्रवास, सध्याची नोकरी आणि इतर माहिती मागितली जाते.
डीएस-१६० आणि डीएस-२६० हे अर्जदाराचं दस्तावेजातील अधिकृत प्रतिनिधीत्व समजलं जातं. या माहितीमुळे दुतावासातील अधिकाऱ्यांना अर्जदाराला अमेरिकेला कोणत्या कारणासाठी जायचं आहे ते समजूत घेता येतं. त्यामुळे व्हिसा अर्जावर निर्णय घेणं त्यांना सोपं होतं. ऑनलाईन व्हिसा अर्जातील अचूक माहिती भरण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असते. अर्जदाराच्या वतीनं तिसऱ्या पक्षानं अर्ज भरला असल्यास अर्जदारानं अर्ज जमा करण्यापूर्वी सगळा तपशील पाहून घ्यावा आणि तो योग्य असल्याची खातरजमा करावी. तिसऱ्या पक्षानं अर्ज भरला असला तरी त्यातील माहितीसाठी अर्जदाराला जबाबदार धरण्यात येईल. डीएस-१६० किंवा डीएस-२६० अर्जात चुकीची माहिती असल्यास अर्जदाराला व्हिसा उशिरा मिळेल किंवा तो नाकारण्यात येईल.
डीएस-१६० किंवा डीएस-२६० मधील माहिती चुकली असल्याचं अर्जदाराच्या लक्षात आल्यास, त्यात त्यांनी व्हिसा मुलाखतीआधी सुधारणा करावी. नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणारे मुलाखतीआधी, प्राधान्यानं बायोमेट्रिक्स किंवा ड्रॉपबॉक्स अपॉईंटमेंटआधी नवा डीएस-१६० अर्ज भरून योग्य माहिती देऊ शकतात. इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणारे india@ustraveldocs.com वरून सहाय्य घेऊन त्यांचा डीएस-२६० अर्ज अपडेट करू शकतात.
डीएस-१६० आणि डीएस-२६० अर्ज भरताना अर्जदारांकडून काही ठराविक चुका होतात. बऱ्याचदा अर्धवट किंवा चुकीची भरली जाणारी माहिती भूतकाळात नाकारण्यात आलेल्या व्हिसा आणि आधी केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दलची असते.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.