"गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरताहेत"; कमला हॅरिस यांनी केली युद्धबंदीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:10 AM2024-03-04T10:10:57+5:302024-03-04T10:11:44+5:30

Kamala Harris : कमला हॅरिस यांनी गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं. गाझामधील लोक उपासमारीने मरत आहेत. तेथील परिस्थिती अतिशय भयावह आणि आपल्या मानवतेच्या विरुद्ध आहे असं म्हटलं आहे.

us vp Kamala Harris calls out israel over catastrophe in gaza | "गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरताहेत"; कमला हॅरिस यांनी केली युद्धबंदीची मागणी

"गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरताहेत"; कमला हॅरिस यांनी केली युद्धबंदीची मागणी

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं. गाझामधील लोक उपासमारीने मरत आहेत. तेथील परिस्थिती अतिशय भयावह आणि आपल्या मानवतेच्या विरुद्ध आहे असं म्हटलं आहे. वृत्तसंस्थेनुसार, कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवतावादी विध्वंस कमी करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यास सांगितलं. यासाठी त्यांनी इस्रायललाही जबाबदार धरले.

कमला हॅरिस म्हणाल्या की, गाझामधील लोक उपासमारीने मरत आहेत. परिस्थिती अमानवी आहे आणि आपली माणुसकी सांगते की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे. इस्रायल सरकारने मदतीसाठी पुढे यावे आणि याला गती देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. युद्धबंदीचे आवाहन केलं आणि हमासला त्या बदल्यात सर्व ओलीसांची सुटका करण्यास सांगितलं. .

इस्रायलने आपल्या सीमा उघडल्या पाहिजेत आणि मदत वितरणावर अनावश्यक निर्बंध लादू नये. याशिवाय इस्रायलने मानवतावादी मदत पुरवणाऱ्या जवानांना आणि ताफ्यांना लक्ष्य करू नये, असंही त्या म्हणाला. इस्रायलने मूलभूत सेवा पुनर्संचयित करण्यासाठी आणि सुव्यवस्था वाढवण्यासाठी कार्य केले पाहिजे जेणेकरून ज्यांना जास्त अन्न, पाणी आणि इंधन आवश्यक आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल.

अमेरिकेने शनिवारी गाझाला पहिली मदत सेवा दिली. हॅरिस सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये इस्रायली युद्ध मंत्रिमंडळ सदस्य बेनी गँट्झ यांना भेटण्याची शक्यता आहे, जिथे त्या बेनी गँट्झला थेट संदेश देऊ शकतात. इस्रायली वृत्तपत्रानुसार, हमासने अद्यापही ओलीस ठेवलेल्यांच्या नावांची संपूर्ण यादी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर इस्रायलने रविवारी काहिराध्ये गाझा युद्धविराम चर्चेवर बहिष्कार टाकला.
 

Web Title: us vp Kamala Harris calls out israel over catastrophe in gaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.