अमेरिका चार भारतीयांना मरणोत्तर सन्मानित करणार

By Admin | Published: May 16, 2016 04:05 AM2016-05-16T04:05:03+5:302016-05-16T04:05:03+5:30

१२४ जणांना त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे

The US will honor four Indians posthumously | अमेरिका चार भारतीयांना मरणोत्तर सन्मानित करणार

अमेरिका चार भारतीयांना मरणोत्तर सन्मानित करणार

googlenewsNext

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षण अभियानात काम करताना मृत्युमुखी पडलेले चार भारतीय शांतिरक्षक व एका नागरिकासह अन्य १२४ जणांना त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचा संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मान करण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवसाच्या निमित्ताने या नागरिकांना डॅग हॅमरस्कजोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय शांतिरक्षकात हेड कॉन्स्टेबल शुभकरण यादव, रायफलमॅन मनीष मलिक, अमल डेका, नायक राकेश कुमार यांचा सहभाग आहे. यांच्यासोबत गगन पंजाबी हेही मारले गेले होते. संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवस दरवर्षी २९ मे रोजी साजरा केला जातो; मात्र यावर्षी तो १९ मे रोजी साजरा होईल. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून सर्व शहीद शांतिरक्षकांना पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतील.

Web Title: The US will honor four Indians posthumously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.